corona virus : एकाचदिवशी ८९ कोरोनाबाधित, कणकवली तालुक्यातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 03:32 PM2020-09-17T15:32:26+5:302020-09-17T15:33:50+5:30
कणकवली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून एकूण रुग्णांचा आकडा ९४७ वर गेला आहे. बुधवारी एकाच दिवशी तालुक्यात ८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी फक्त कणकवली शहरात २४ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
कणकवली : कणकवली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून एकूण रुग्णांचा आकडा ९४७ वर गेला आहे. बुधवारी एकाच दिवशी तालुक्यात ८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी फक्त कणकवली शहरात २४ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
बुधवारी दुपारी आलेल्या तपासणी अहवालामध्ये सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कणकवली शहर २४ (त्यामध्ये बांधकरवाडी १०, बाजारपेठ १, गांगोवाडी ३, जळकेवाडी १, शिवाजीनगर ४, कनकनगर १, भालचंद्रनगर १, सोनगेवाडी १ व अन्य २), कलमठ २०, हळवल १०, पियाळी २, खारेपाटण १०, हरकुळ बुद्रुक १, आशिये ११, फोंडा १, तळेरे ६, जानवली ३, हुंबरठ १ असे मिळून ८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कणकवली तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या धोकादायक ठरत आहे.
मंगळवारी फोंडाघाट येथील रहिवासी व भाजपा सरचिटणीस मधुसुदन बांदिवडेकर यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानेतालुक्यात आणखीनच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दर दिवशी वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन हादरले आहे. कणकवली शहरात बुधवारी एकाच दिवशी २४रुग्ण आढळल्यामुळे जनता कर्फ्यू लावण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.