corona virus : ३२ वाहनचालकांवर कारवाई, विनाकारण फिरणाऱ्यांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 03:45 PM2020-07-27T15:45:16+5:302020-07-27T15:46:41+5:30
सध्या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना खारेपाटण बाजारपेठ येथे विनाकारण फिरणारे वाहनचालक व मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.
खारेपाटण : सध्या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना खारेपाटण बाजारपेठ येथे विनाकारण फिरणारे वाहनचालक व मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र बाईत, पोलीस हवालदार संदेश आबिटकर यांनी खारेपाटण येथे एकूण ३२ वाहन चालकांवर कारवाई केली. सुमारे ६५०० पेक्षा अधिक रक्कम त्यांच्याकडून दंड म्हणून वसूल करण्यात आली.
खारेपाटण ग्रामस्तरीय सनियंत्रण समितीने व खारेपाटण ग्रामपंचायतीने सरपंच रमाकांत राऊत यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाच्या काळात बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून व्यापारी बांधवांच्या मदतीने ठिकठिकाणी नो पार्किंग झोनचे बोर्ड लावले होते.
तरीदेखील भर बाजारपेठेत कुठेही वाहन उभे करून ठेवणे, तोंडाला मास्क न लावता फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे आदी कारणास्तव पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकी, तीनचाकी व चारचाकी गाड्यांचा समावेश आहे.