corona virus : कणकवलीत स्वॅब देणाऱ्यांची गर्दी, धोका वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:56 PM2020-08-19T15:56:40+5:302020-08-19T15:58:04+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कणकवली तालुक्यात आतापर्यंत २९६ बाधित रुग्ण सापडले असून त्यांच्या हाय रिस्क संपर्कातील तसेच संशयित व्यक्ती स्वॅब देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथील स्वॅब कलेक्शन सेंटरवर येत आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढल्याने गर्दीतही वाढ होत असून आरोग्य विभागाने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कणकवली तालुक्यात आतापर्यंत २९६ बाधित रुग्ण सापडले असून त्यांच्या हाय रिस्क संपर्कातील तसेच संशयित व्यक्ती स्वॅब देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथील स्वॅब कलेक्शन सेंटरवर येत आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढल्याने गर्दीतही वाढ होत असून आरोग्य विभागाने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी याच सेंटरमधून स्वॅब घेतल्यानंतर स्वॅब कीट लिकेज होण्याचा प्रकार घडला होता. मात्र, आरोग्य विभागाने पुन्हा नव्याने २० जणांचे स्वॅब घेत कीट योग्य नसल्याचे सांगितले होते.
जो संशयित किंवा हाय रिस्कमधील असेल तर त्याचे स्वॅब घेतले जातात. असा संशयित पॉझिटिव्ह जर कुणी या गर्दीत असेल तर त्याची बाधा जो निगेटिव्ह येणारा आहे त्याला होऊ शकते. चार तासांहून अधिक काळ असे लोक एकत्र असतील तर गणेशोत्सवाच्या काळात ही मोठी जोखीम आहे. त्याऐवजी आरोग्य विभागाने सोपी आणि वेगवान पद्धत सुरू करायला हवी. अन्यथा कोरोना साखळी तुटण्याऐवजी आणखी मजबूत होण्याची भीती व्यक्त केली जात
आहे.