corona virus -देवगड आगार व्यवस्थापनाच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 04:23 PM2020-03-21T16:23:13+5:302020-03-21T16:26:52+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आगार व्यवस्थापनाने पुणे, तुळजापूर, सांगली व रत्नागिरी या लांब पल्ल्याचा चार फेऱ्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
देवगड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आगार व्यवस्थापनाने पुणे, तुळजापूर, सांगली व रत्नागिरी या लांब पल्ल्याचा चार फेऱ्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज झाले असून लांब पल्ल्याची सकाळी ८.४५ वाजता सुटणारी देवगड-रत्नागिरी, सकाळी १०.१५ वाजता सुटणारी देवगड तुळजापूर, दुपारी १२ वाजता सुटणारी देवगड सांगली या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर सायंकाळी ५.३० ला सुटणारी देवगड पुणे ही फेरी कोल्हापूरपर्यंत सोडली आहे अशी माहिती स्थानकप्रमुख गोरे यांनी दिली.
शाळांना सुटी असल्याने शालेय फेऱ्या बंद केल्या आहेत. दहावीची परीक्षा असल्याने त्या फेºया सुरू आहेत. बाजार बंद झाल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे.