corona virus : कोविड संपला असे गृहित धरू नका, शासनाचे नियम पाळा : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:38 PM2020-11-24T12:38:04+5:302020-11-24T12:39:52+5:30

Coronavirus, Deepak Kesarkar, sindhudurg नागरिकांनी कोविड संपला असे गृहित धरू नका. शासनाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा सुरू होत आहेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझर शाळेत असणे आवश्यक आहे. यासाठी आमदार फंडातून तालुक्याला निधीही देण्यात येईल. तसेच पुढील काळात सुसज्ज अशी रुग्णवाहिका वेंगुर्ला तालुक्याला देण्यात येईल, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

corona virus: Don't assume covid is over, follow government rules: Deepak Kesarkar | corona virus : कोविड संपला असे गृहित धरू नका, शासनाचे नियम पाळा : दीपक केसरकर

होडावडा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे फित कापून उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सभापती अनुश्री कांबळी, यशवंत परब, अदिती नाईक, अरविंद नाईक, सुनील मोरजकर आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकोविड संपला असे गृहित धरू नका, शासनाचे नियम पाळा : दीपक केसरकर होडावडा ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन

तळवडे : होडावडा ग्रामपंचायतीची अतिशय सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. पुढील काळात या इमारतीच्या सभागृहासाठी निधी देण्यात येईल. तसेच तत्काळ ग्रामपंचायतीसाठी एक कॉम्प्युटर, प्रिंटर व प्रोजेक्टर या आठवड्यात देण्यात येईल. नागरिकांनी कोविड संपला असे गृहित धरू नका. शासनाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा सुरू होत आहेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझर शाळेत असणे आवश्यक आहे. यासाठी आमदार फंडातून तालुक्याला निधीही देण्यात येईल. तसेच पुढील काळात सुसज्ज अशी रुग्णवाहिका वेंगुर्ला तालुक्याला देण्यात येईल, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे माजी गृहराज्यमंत्री, विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते फित कापून तसेच फलकाचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. जनसुविधा योजना व १४ वा वित्त आयोगअंतर्गत या नूतन सुसज्ज ग्रामपंचायत इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.

यावेळी सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, सदस्य सुनील मोरजकर, सरपंच अदिती नाईक, सचिन वालावलकर, निलेश चमणकर, मातोंड सरपंच जानवी परब, होडावडा उपसरपंच रसिका केळुसकर, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, अण्णा वजराठकर, नम्रता बोवलेकर, देवा कांबळी, उपतालुकाप्रमुख शशिकांत परब, नितीन मांजरेकर, अरविंद नाईक, रवी केळुसकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा परब, उत्तम धुरी, संदेश सावंत उपस्थित होते.

ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिगंबर दळवी, रमाकांत नाईक तसेच विनामूल्य जमीन देणारे जमीन मालक रामचंद्र नाईक, प्रसाद नाईक, सर्व अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

 

Web Title: corona virus: Don't assume covid is over, follow government rules: Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.