corona virus -दुबईतून आलेल्या व्यक्तीची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:37 PM2020-03-20T17:37:37+5:302020-03-20T17:39:22+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून दुबईमधून तिर्लोट येथे आलेल्या एका व्यक्तीची तपासणी करण्यात आली आहे. मात्र कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याची माहिती पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोड यांनी दिली. मात्र त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
देवगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून दुबईमधून तिर्लोट येथे आलेल्या एका व्यक्तीची तपासणी करण्यात आली आहे. मात्र कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याची माहिती पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोड यांनी दिली. मात्र त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणुने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. देशात बाधितांची संख्या वाढत असताना तसेच जवळच असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्ण आढळल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट झालेल्या आरोग्य यंत्रणेमार्फत बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येत आहे.
दुबईहून तिर्लोट येथे आलेल्या नागरिकांची गुरूवारी पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली. मात्र कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत तरीही त्याला घराबाहेर पडू नये अशा सूचना देऊन आरोग्य यंत्रणेच्या निरीक्षणाखाली त्या व्यक्तीला ठेवण्यात आले आहे.