corona virus - नाटळ येथे मोफत मास्क, साबणाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 03:16 PM2020-03-24T15:16:13+5:302020-03-24T15:17:49+5:30
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाटळ-तळेवाडी, हुमलेटेंब, थोरले मोहुळ येथील ग्रामस्थांना थ्रेशोल्ड व थ्री डॉटस् या कंपन्यांच्या सौजन्याने सांगवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते मोफत मास्क व स्वच्छतेसाठी डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाबाबत जनजागृतीपर मागदर्शन करण्यात आले.
कनेडी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाटळ-तळेवाडी, हुमलेटेंब, थोरले मोहुळ येथील ग्रामस्थांना थ्रेशोल्ड व थ्री डॉटस् या कंपन्यांच्या सौजन्याने सांगवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते मोफत मास्क व स्वच्छतेसाठी डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाबाबत जनजागृतीपर मागदर्शन करण्यात आले.
थ्रेशोल्ड ही आर्किटेक्चर कंपनी तर थ्री डॉटस् ही अॅडव्हरटायझिंग कंपनी असून या दोन्ही कंपन्यांचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अवधूत सावंत (डोंगरे) आहेत. या दोन्ही क्षेत्रात त्यांनी बरीच वर्षे काम करून नावलौकिक मिळविला आहे. सामाजिक बांधीलकी जपत समाजकार्य ते करीत आले आहेत. येथील ग्रामस्थ कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी व खबरदारी म्हणून मास्क व साबणाचे वाटप या कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी नाटळ उपसरपंच दत्ताराम खरात, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तांबे, निवृत्त पोलीस अधिकारी कृष्णाजी सावंत, कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. ए. फाटक, माहिती अधिकारी तथा आरोग्य सहाय्यक सूर्यकांत आगटे, माजी एसटी वाहक सदानंद मराठे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी वृध्द, अंध, लहान मुले, महिला यांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी या वस्तूंचे वाटप करण्यात आले. डॉ. फाटक यांनी कोरोना संसर्ग कसा होतो, त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. आगटे यांनी स्वच्छतेबाबत माहिती दिली. उपसरपंच खरात यांनी ग्रामस्थांना जागृत राहण्याचे आवाहन केले.