corona virus -सिंधुदुर्ग शहरासह ग्रामीण भागातही पूर्णपणे लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 04:55 PM2020-03-23T16:55:55+5:302020-03-23T16:57:39+5:30
सिंधुदुर्ग : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व रस्त्यांवर, बाजारपेठेत आणि बसस्थानकात आणि नेहमी गजबजणारा मुंबई-गोवा महामार्गावर ...
सिंधुदुर्ग : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व रस्त्यांवर, बाजारपेठेत आणि बसस्थानकात आणि नेहमी गजबजणारा मुंबई-गोवा महामार्गावर शुकशुकाट पसरला होता. लोकांनी स्वयंस्फूर्तीने घरातच राहणे पसंत केले. एरवी कोणत्या कोणत्या कारणामुळे गजबजणारी शहरे ग्रामीण भागासह पूर्णपणे स्तब्ध झाली होती.
सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनी घरातच राहणे पसंत केले. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या सिमेवर असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील सिमांवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. गाड्यांची तपासणीही करण्यात येत होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेले मालवण शहर पूर्णपणे स्तब्ध झाले होते. ऐतिहासीक सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली पर्यटन सेंटर यामुळे देश-परदेशात नावारूपास आलेल्या मालवण शहरातील सर्व रस्ते सुने-सुने होते.
चार युवकांना पोलिसांकडून प्रसाद
आरोग्य व पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले. जिल्हा प्रशासन अलर्ट होते. नेहमीच वर्दळ असणारा मुंबई-गोवा महामार्ग सामसूम होता. रस्त्यावर पोलीस, आरोग्य, मेडिकल, पेट्रोल पंपसारखे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीच नसल्यामुळे सारे काही शांत वातावरण होते. सावंतवाडी शहरात विनाकारण फिरणाऱ्या चार युवकांना पोलिसांनी प्रसाद दिला.