corona virus : पिपीई कीट घालुन तळेरेत युवकांनी केले वृध्दावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:59 PM2020-08-29T13:59:11+5:302020-08-29T14:01:13+5:30

स्वॅब टेस्टचा अहवाल येण्याआधीच वैद्यकीय उपचारादरम्यान बुधवारी निधन झालेल्या तळेरे गावातील वृद्धावर तळेरे येथील युवकांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. कणकवली सभापती दिलीप तळेकर, प्रसाद कल्याणकर, प्रदिप तळेकर, प्रफुल तळेकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी दाखविलेल्या या वृत्तीतून माणुसकीचे दर्शन घडविले असून याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

Corona virus: Funeral performed on old age | corona virus : पिपीई कीट घालुन तळेरेत युवकांनी केले वृध्दावर अंत्यसंस्कार

तळेरेत पिपीई कीट घालुन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Next
ठळक मुद्देपिपीई कीट घालुन तळेरेत युवकांनी केले वृध्दावर अंत्यसंस्कारपरिसरात कौतुक : माणुसकीचे घडविले दर्शन

तळेरे : स्वॅब टेस्टचा अहवाल येण्याआधीच वैद्यकीय उपचारादरम्यान बुधवारी निधन झालेल्या तळेरे गावातील वृद्धावर तळेरे येथील युवकांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. कणकवली सभापती दिलीप तळेकर, प्रसाद कल्याणकर, प्रदिप तळेकर, प्रफुल तळेकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी दाखविलेल्या या वृत्तीतून माणुसकीचे दर्शन घडविले असून याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

तळेरे गावठण येथील राजाराम देसाई (६८) यांना मंगळवारी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेऊन पुढील उपचार सुरु करण्यात आले. परंतु, स्वॅब टेस्टचा अहवाल येण्यापूर्वीच बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. निधनानंतरही त्यांचा स्वॅब टेस्टचा अहवाल आला नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान, देसाई यांचा मृत्यू झाल्याचे समजताच पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ ओरोस येथे धाव घेतली. देसाई यांचा कोरोना अहवाल आजच मिळणे शक्य नसल्याने मृतदेहाचे करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोना अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार कसे? ही अडचण होती. त्याशिवाय वैद्यकीय अधिकाºयांनी मृतदेह ताब्यात देणार नसल्याचे सांगितले.

तरीदेखील पूर्णपणे तो मृतदेह तळेरे येथे आणून दिलीप तळेकर व त्यांचे तळेरे येथील सहकारी यांनी अत्यंत धाडसाने स्वत: पिपीई किट परिधान करुन देसाई यांच्यावर तळेरे येथे स्मशानभूमीत सर्व नियमांचे पालन करुन अत्यंसंस्कार केले.

राजाराम देसाई हे देसाई मामा या नावाने परिचित होते. सर्वसामान्य कुटून्बतिल असलेल्या देसाई यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

स्वत:चा जीव धोक्यात घालून विधी

यावेळी देसाई यांचा मुलगा, काही नातेवाईक, प्रसाद कल्याणकर, प्रदिप तळेकर, प्रफुल तळेकर उपस्थित होते. देसाई यांचा अहवाल यथावकाश पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह येईल. परंतु कोरोना रिपोर्ट यायचा असतानाही दिलीप तळेकर आणि सहकाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून दाखवलेले माणुसकीचे दर्शन नक्कीच कौतुकास्पद आहे.
 

Web Title: Corona virus: Funeral performed on old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.