corona virus : शासकीय चाचणी पॉझिटिव्ह, खासगी निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:35 PM2020-09-02T16:35:07+5:302020-09-02T16:36:06+5:30
कणकवली तालुक्यातील एका गावात एकाच व्यक्तीचे कोविड-१९ अहवाल वेगवेगळे आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर या अहवालांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये या अहवालांबाबत साशंकता व्यक्त केली जात असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
तळेरे : कणकवली तालुक्यातील एका गावात एकाच व्यक्तीचे कोविड-१९ अहवाल वेगवेगळे आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर या अहवालांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये या अहवालांबाबत साशंकता व्यक्त केली जात असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
तालुक्यातील एका गावातील व्यक्तीला नोकरीवर हजर व्हायचे असल्याने त्यांनी फक्त खबरदारी म्हणून शासकीय कोविड-१९ चाचणी करून घेतली. दरम्यान, त्यांना कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.
शासकीय चाचणी पॉझिटिव्ह आली. कोणतीही लक्षणे नसताना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी खासगी चाचणी केली. खासगी केलेली चाचणी त्यांची निगेटिव्ह आली. फक्त एका दिवसाने केलेली चाचणी निगेटिव्ह आली.
विश्वास कोणावर ठेवायचा ?
एकाच व्यक्तिच्या शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात केलेल्या चाचणीत अशाप्रकारची तफावत येत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशाप्रकारचे अहवाल चुकीचे येत असतील आणि त्यामुळे कुटुंबाला मन:स्ताप होत असेल तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.