corona virus : वाढीव वीजबिले कशी?: सावंतवाडीत वीज वितरणचे अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 06:23 PM2020-08-01T18:23:35+5:302020-08-01T18:26:29+5:30
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन होणारी गर्दी कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी येथील नागरिकांच्यावतीने करीत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.
सावंतवाडी : चुकीच्या पद्धतीने काढलेली वाढीव बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची वीज वितरणच्या कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन होणारी गर्दी कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी येथील नागरिकांच्यावतीने करीत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.
यावेळी नगरसेवक राजू बेग, विलास जाधव, दिलीप भालेकर, संतोष कासार, सर्फराज दुर्वे, मनसोर खावसा, मोहम्मद शेख, नजीर शेख, मोहम्मद सावकार, प्रताप घाडगे, प्रतीक्षा घाडगे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी वाढीव बिलांसंदर्भात ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर स्वतंत्र टेबल लावून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाईल याची खबरदारी घेऊ, असे आश्वासन वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.
येथील नागरिकांनी वाढीव बिलासंदर्भात वीज वितरणला घेराव घालत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. चुकीच्या पद्धतीने काढलेली वाढीव बिले कमी करण्यासाठी ग्राहकांची विद्युत वितरणच्या कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. हे योग्य नाही, असे सांगत कार्यालयातील गर्दी कमी करा, अशी मागणी केली.