corona virus : सिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 01:12 PM2020-09-11T13:12:37+5:302020-09-11T13:14:13+5:30

देशात आणि राज्याच्या इतर भागात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती अमलात आणली जात आहे.त्यामुळे या परिणामकारक उपचार पद्धतीचा वापर सिंधुदुर्ग जिल्ह्यात करा. अशी मागणी एका पत्राद्वारे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

corona virus: Implement plasma therapy in Sindhudurg! | corona virus : सिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा !

corona virus : सिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा !

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा !नितेश राणे यांची मागणी ; जिल्हा प्रशासनाला लिहिले पत्र

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. जे कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करा.

देशात आणि राज्याच्या इतर भागात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती अमलात आणली जात आहे.त्यामुळे या परिणामकारक उपचार पद्धतीचा वापर सिंधुदुर्ग जिल्ह्यात करा. अशी मागणी एका पत्राद्वारे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जनतेचा अँटीजन रॅपिड टेस्टवर विश्वास नाही. त्यामुळे जास्तीजास्त आरटीपीसीआर टेस्ट करण्यात याव्यात. सद्याच्या कोरोना महामारीच्या आजाराने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर शासनाकडून विविध उपाय योजनांद्वारे आजार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे .

त्या अनुषंगाने मी २९ जून २०२० रोजीच्या पत्राद्वारे प्लाझ्मा थेरपीद्वारे कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सूचना जिल्हा शल्य चिकित्सक , सिंधुदुर्ग यांना केली होती . त्यावर अद्याप काही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही .

सद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे . त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करून त्याद्वारे कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचार झाल्यास आजार आटोक्यात येऊ शकतो. त्यामुळे याबाबत गंभीरपणे त्वरीत निर्णय घ्यावा .

त्याचप्रमाणे सद्या कोरोना संशयित असलेल्या रुग्णांची अँटीजन रॅपिड तपासणी करण्यात येते. परंतु ती पद्धती सदोष असल्याचे तज्ञांचे म्हणणे असून या म्हणण्यास पूरक अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोरोना संशयित रूग्णांची जास्तीत जास्त आर्टिपीसीआर तपासणी करण्यात यावी , अशी मागणी जनतेकडून होत आहे . त्यावर लोकांचा जास्त विश्वास आहे .

दोन्ही विषयांबाबबत आपले स्तरावरून त्वरीत कार्यवाही व्हावी असे पत्राद्वारे आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना कळविले आहे.
 

Web Title: corona virus: Implement plasma therapy in Sindhudurg!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.