corona virus : कणकवली बाजारपेठेत खरेदीसाठी पुन्हा गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:27 PM2020-09-19T17:27:08+5:302020-09-19T17:29:19+5:30

कणकवली नगरपंचायत व्यापारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, शहरातील प्रमुख नागरिक यांचा बैठकीत २० ते २७ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या कालावधीतील आठ दिवसांचा बाजार खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी दिसून येत होती.

corona virus: Kankavali market crowded again for shopping! | corona virus : कणकवली बाजारपेठेत खरेदीसाठी पुन्हा गर्दी !

कणकवली शहरात रविवारपासून करफ्यू असल्याने पुन्हा नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली बाजारपेठेत खरेदीसाठी पुन्हा गर्दी !कर्फ्यू असल्याने आठ दिवसांसाठी बेगमी

कणकवली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कणकवली शहरात मोठ्या संख्येने वाढत असून कोरोनाबधितांच्या संख्येतही भर पडत आहे. २० ते २७ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय कणकवली नगरपंचायत व्यापारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी , शहरातील प्रमुख नागरिक यांचा बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे या कालावधीतील आठ दिवसांचा बाजार खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी दिसून येत होती.

कणकवली शहरात शुक्रवारी दिवसभर पावसाने जोर धरला होता. मात्र, ग्राहकांसह वाहनांची संख्या वाढल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली. याच दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा मात्र पार फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करणाऱ्या ग्राहकांना कोरोना विषाणूची भीती नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. कणकवली नगरपंचायतसह, कणकवली पोलीस प्रशासन विविध माध्यमातून कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करीत असून त्याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. हे धोकादायक ठरत आहे.

नगरपंचायतीच्यावतीने स्पीकर वरून उद्घोषणा करून जनता कर्फ्यू बाबत शहरात जागृती करण्यात आली. तर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस, होमगार्ड गर्दी न करण्याचे आवाहन नागरिकांना करीत होते. तसेच वाहतूक पोलिसांकडून गाडीची कागदपत्रे, गाडी चालविण्याचा परवाना यांची तपासणी होत होती.

 

Web Title: corona virus: Kankavali market crowded again for shopping!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.