corona virus : एनएबीएलकडून कोविड-१९ प्रयोगशाळेला मानांकन प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 02:15 PM2020-08-29T14:15:04+5:302020-08-29T14:16:41+5:30

पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलने आरोग्यक्षेत्रात आणखीन एक पुढचे पाऊल टाकले आहे. चाचणी आणि कॅॅलिब्रेशन प्रयोगशाळेसाठी नॅॅशनल अ‍ॅक्रेडीएशन बोर्ड आॅफ लॅबोरेटरी अर्थात एनएबीएलकडून या हॉस्पिटलमधील कोविड - १९ प्रयोगशाळेला मानांकन प्राप्त झाले आहे.

corona virus: Kovid-19 laboratory certified by NABL | corona virus : एनएबीएलकडून कोविड-१९ प्रयोगशाळेला मानांकन प्राप्त

corona virus : एनएबीएलकडून कोविड-१९ प्रयोगशाळेला मानांकन प्राप्त

Next
ठळक मुद्देएनएबीएलकडून कोविड-१९ प्रयोगशाळेला मानांकन प्राप्तएसएसपीएम मेडिकल कॉलेज, लाईफ टाईम हॉस्पिटलचे आरोग्यक्षेत्रात पुढचे पाऊल

कणकवली : पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलने आरोग्यक्षेत्रात आणखीन एक पुढचे पाऊल टाकले आहे. चाचणी आणि कॅॅलिब्रेशन प्रयोगशाळेसाठी नॅॅशनल अ‍ॅक्रेडीएशन बोर्ड आॅफ लॅबोरेटरी अर्थात एनएबीएलकडून या हॉस्पिटलमधील कोविड - १९ प्रयोगशाळेला मानांकन प्राप्त झाले आहे.

या प्रयोगशाळेमध्ये अवघ्या पाच तासांत शंभर नमुने तपासण्याची क्षमता आहे. ही प्रयोगशाळा मान्यताप्राप्त झाल्याने एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलमधील आरोग्यव्यवस्थेचा देशासहीत जागतिक स्तरावर ठसा उमटवण्याचा दिशानिर्देश दिला आहे.

व्यवसाय सुरु करण्यासाठी कामगारांचे कोविड -१९ तपासणी प्रमाणपत्र तसेच आंतरराज्यात नोकरीनिमित्त आवश्यक कोविड - १९ चा अहवाल तपासणी अंती उपलब्ध करून दिला जातो. जिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी कोविड - १९ चा अहवाल आवश्यक असल्यास आणि रुग्ण जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात उपचार घेत असल्यास या प्रयोगशाळेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Web Title: corona virus: Kovid-19 laboratory certified by NABL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.