corona virus : कणकवली तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या शतकपार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 01:16 PM2020-07-08T13:16:52+5:302020-07-08T13:18:39+5:30

कणकवली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता ती शतकपार झाली आहे. बुधवारी सकाळी आलेल्या स्वॅब चाचणी अहवालात कणकवली तालुक्यातील तिघे रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकूण संख्या १०२ वर पोहचली आहे.

corona virus: Number of corona patients in Kankavali taluka is over a hundred! | corona virus : कणकवली तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या शतकपार !

कणकवली शहरात कंटेन्मेंट झोन मधील रस्ते पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत.

Next
ठळक मुद्देकणकवली तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या शतकपार !

सुधीर राणे

कणकवली : कणकवली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता ती शतकपार झाली आहे. बुधवारी सकाळी आलेल्या स्वॅब चाचणी अहवालात कणकवली तालुक्यातील तिघे रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकूण संख्या १०२ वर पोहचली आहे.

नाटळ येथे दोन तर ओझरम गावातील एक रुग्ण बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना बाधित २५० रुग्णांपैकी कणकवली तालुक्यातील १०२ रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कणकवली तालुक्यातील नडगिवे येथे सापडला होता. मुंबईवरून गावी आलेला हा रुग्ण होता.
वाढत्या रुग्ण संख्येमुळे कणकवली तालुका जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. सध्या जोरदार पाऊस सुरू असून लवकरच गणेशोत्सवासाठी मुंबईकर तसेच अन्य व्यक्ती जिल्ह्याबाहेरून सिंधुदुर्गात पर्यायाने कणकवली तालुक्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कणकवली शहरात रुग्ण सापडल्याने बाजारपेठेतील अर्धा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यापरिसरातील रस्ते लोखंडी पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
 

Web Title: corona virus: Number of corona patients in Kankavali taluka is over a hundred!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.