corona virus : पोलिसांची धडक कारवाई सुरू, ६ हजार ४०० रुपये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 04:34 PM2020-07-08T16:34:11+5:302020-07-08T16:36:23+5:30

सावंतवाडी शहरात सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी धडक मोहीम राबविली. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत. संचारबंदीच्या काळात गरज नसतानाही बाजारात फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, अनेक ठिकाणी धडक मोहीम हाती घेतली आहे.

corona virus: Police crackdown continues, fine of Rs 6,400 recovered | corona virus : पोलिसांची धडक कारवाई सुरू, ६ हजार ४०० रुपये दंड वसूल

सावंतवाडी शहरात असे नाक्यानाक्यावर पोलीस तैनात करण्यात आले होते.

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांची धडक कारवाई सुरू, ६ हजार ४०० रुपये दंड वसूलमास्कशिवाय फिरणाऱ्यांसह रस्त्यावर थुंकणाऱ्यांना दणका

सावंतवाडी : शहरात सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी धडक मोहीम राबविली. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत. संचारबंदीच्या काळात गरज नसतानाही बाजारात फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, अनेक ठिकाणी धडक मोहीम हाती घेतली आहे. सावंतवाडीतील बाहेरचावाडा तसेच गांधी चौक व जयप्रकाश चौक आदी ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी आपल्या सहकाºयांसह नाकाबंदी करीत कारवाई केली.

पहिल्या दिवशी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर कारवाईचा बडगा दुसऱ्या दिवशीही कायम होता. अनेकजण गरज नसताना बाजारात फिरत होते. तर काही जण मास्क शिवाय फिरताना पोलिसांना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मास्कशिवाय फिरणाऱ्या ३० जणांसह सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान यावेळी संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सावंतवाडी पोलीस व पालिका पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. या कारवाईत संबंधितांना प्रत्येकी दोनशे रुपये असा मिळून ६ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल केला. पोलीस आणि पालिका प्रशासनाच्यावतीने दिवसभर कारवाई सुरू होती. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्यासह पालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही सहभाग दर्शविला.

यादव यांचा धसका

लॉकडाऊनच्या काळात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी जोरदार कारवाई करीत गरज नसताना बाजारात फिरणाऱ्यांना दंड केला होता. तर काहींना उठाबशा काढण्यास भाग पाडले होते. यातून युवकांसह वृद्धही सुटले नव्हते. त्यामुळे यादव यांचा काही जणांनी चांगलाच धसका घेतला.

 

Web Title: corona virus: Police crackdown continues, fine of Rs 6,400 recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.