corona virus : कणकवलीत ९२५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:49 PM2020-12-03T16:49:20+5:302020-12-03T16:51:44+5:30

CoronavirusUnlock, traffic police, Kankavli, sindhudurg कणकवलीत पोलिसांनी गेल्या ८ दिवसांत मोटार वाहन कायद्यांतर्गत ९२५ जणांवर कारवाई केली आहे. त्या वाहनचालकांना २ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना आळा बसणार आहे. या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत करण्यात येत आहे.

corona virus: Punitive action against 925 drivers in Kankavali | corona virus : कणकवलीत ९२५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

कणकवली येथे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली.

Next
ठळक मुद्देकणकवलीत ९२५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईवाहतूक पोलीस शाखा, कसाल वाहतूक व कणकवली पोलीस ठाणे यांची कारवाई

कणकवली : कणकवलीत पोलिसांनी गेल्या ८ दिवसांत मोटार वाहन कायद्यांतर्गत ९२५ जणांवर कारवाई केली आहे. त्या वाहनचालकांना २ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना आळा बसणार आहे. या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत करण्यात येत आहे.

कणकवली-कनेडी मार्गावर नुकताच भीषण अपघात झाला होता. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत वाहतुकीच्या बाबतीत आता पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलिसांनी सीटबेल्ट नसणे, हेल्मेट घातलेले नसणे, विना लायसन्स वाहन चालिणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा कारणांखाली गेल्या ७ दिवसांत तब्बल ९२५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यावेळी सर्वांना मिळून २ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कणकवलीत जानवली पूल, गडनदी पूल, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ आदी ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक पोलीस शाखा, कसाल वाहतूक पोलीस व कणकवली पोलीस ठाणे वाहतूक पोलीस यांच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर व पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, महामार्ग पोलीस कसाल पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस विश्वजीत परब, बस्त्याव पिंटो, प्रकाश गवस, संदेश आंबिटकर, चंद्रकांत माने, सावकार वावरे, पांढरे, निकम, काकडे, नागेश गावकर, वेंगुर्लेकर, मेगाने, सरकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
 

Web Title: corona virus: Punitive action against 925 drivers in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.