corona virus shidndurug updates-सिंधुदुर्गात पुन्हा ३५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 19:26 IST2021-03-30T19:21:43+5:302021-03-30T19:26:21+5:30
CoronaVirus Sawantwadi Sindhudurgnews- सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ११ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

corona virus shidndurug updates-सिंधुदुर्गात पुन्हा ३५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
ठळक मुद्देसिंधुदुर्गात पुन्हा ३५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसावंतवाडी तालुक्यातही ११ पॉझिटीव्ह रुग्ण
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ११ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
या मध्ये शहरात खासकीलवाडा येथे एक, माठेवाडा येथे एक तर सबनीसवाडा येथे दोन रुग्ण सापडले आहेत. तर मळगाव, दाणोली, बावळाट, निरवडे या गावांमध्ये प्रत्येकी एक- एक रुग्ण सापडला आहे. तर सावरवाड येथे तीन रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत सावंतवाडी तालुक्यात ४२ रुग्ण सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.