Corona virus In Sindhdurg : जिल्हा परिषद स्वनिधीतून सरपंचांना देणार विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 06:28 PM2021-06-24T18:28:42+5:302021-06-24T18:30:32+5:30
सिंधुदुर्ग : कोरोना महामारीत गावपातळीवर राबणाऱ्या सरपंचांना विमा कवच असावे, ही मागणी राज्य सरकार पूर्ण करू शकले नाही. मात्र ...
सिंधुदुर्ग : कोरोना महामारीत गावपातळीवर राबणाऱ्या सरपंचांना विमा कवच असावे, ही मागणी राज्य सरकार पूर्ण करू शकले नाही. मात्र सिंधुदुर्गजिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व सरपंचांना आपल्या स्वनिधीतून विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित सुरू झाली. प्रशासन व त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा अभिनव उपक्रम राबविता आला. सरपंचांसाठी असा उपक्रम राबविणारी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली.
अध्यक्षा संजना सावंत यांनी आपल्या कार्याची छाप अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यापासून दाखविली आहे. कोरोनाचा काळ असतानाही विविध उपक्रम आणि विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सावंत यांनी कामाचा धडाका सुरू ठेवला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सहकार्य केल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये चांगले काम करता आले असल्याचेही सावंत म्हणाल्या.
सरपंचांना विमा कवच देण्याच्या निर्णयातही प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयात एकमुखी साथ दिल्यामुळे जिल्ह्यातील ४२८ सरपंचांना एक लाखाचे विमा संरक्षण कोरोनाच्या साथीत मिळणार आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी, जिल्ह्यातील नागरिकांसाठी, सरपंच व अन्य लोकप्रतिनिधींसाठी ही जिल्हा परिषद विविध प्रश्नांवर चांगले काम करील, असे अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगितले.
जिल्ह्यातील १५ प्रातिनिधिक सरपंचांना निमंत्रित करून त्यांना ही विमा पॉलिसी बहाल करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, सभापती अंकुश जाधव, शर्वानी गावकर, डॉ. अनिशा दळवी, सावी लोके आदी उपस्थित होते.
प्रातिनिधिक स्वरूपात पॉलिसीचे वितरण
यावेळी सरपंच नागेश अहिर, गुरुप्रसाद वायंगणकर, संजय सावंत, विठ्ठल तेली, विनोद सुके, अक्रम खान, तुकाराम साहिल, वैदही गुरव सरपंच, राजाराम जाधव, नारायण मांजरेकर, विश्राम सावंत, मंगेश तळगावकर, महादेव धुरी, शंकर घारे, मनोज उगवेकर, नागेश परब, इत्यादी सरपंच उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात पॉलिसीचे वितरण करण्यात आले.
प्रातिनिधिक स्वरूपात पॉलिसीचे वितरण
यावेळी सरपंच नागेश अहिर, गुरुप्रसाद वायंगणकर, संजय सावंत, विठ्ठल तेली, विनोद सुके, अक्रम खान, तुकाराम साहिल, वैदही गुरव सरपंच, राजाराम जाधव, नारायण मांजरेकर, विश्राम सावंत, मंगेश तळगावकर, महादेव धुरी, शंकर घारे, मनोज उगवेकर, नागेश परब, इत्यादी सरपंच उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात पॉलिसीचे वितरण करण्यात आले.