corona virus : सिंधुदुर्गात राज्याच्या तुलनेत मृत्यूचा दर कमी, मृत्यूंमध्ये ८० टक्के ज्येष्ठ व्यक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 02:34 PM2020-09-12T14:34:18+5:302020-09-12T14:35:26+5:30
गेल्या सव्वा महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ३३ जणांचा मृत्यू या महामारीने झाला आहे. राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्गचा मृत्यू दर कमी आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ८० टक्के ज्येष्ठ व्यक्ती आहेत तर ९० टक्के जणांना गंभीर स्वरूपाचा आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
सिंधुदुर्ग : गेल्या सव्वा महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ३३ जणांचा मृत्यू या महामारीने झाला आहे. राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्गचा मृत्यू दर कमी आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ८० टक्के ज्येष्ठ व्यक्ती आहेत तर ९० टक्के जणांना गंभीर स्वरूपाचा आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
या आजाराने एकही मृत्यू होऊ नये हा आपला उद्देश आहे. म्हणून आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन मोहीम सुरू करून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच मृत्यूचे प्रमाण आणखीन कमी येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हावासीयांना उद्देशून सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या सव्वा महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.
सध्या २१७४ रुग्ण आहेत. तर १०३८ रुग्ण सक्रिय आहेत. ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर ३ टक्के आहे. परंतु राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. पण या आजाराने एकही रुग्ण दगावता नये हा आपला उद्देश आहे. या आजारात दगावलेल्या ९० टक्के रुग्णांना कॅन्सर, हृदयसंबंधी, उच्च रक्तदाब, किडनी, दमा यासह गंभीर आजार होते, हे आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.