Coronavirus Unlock : कणकवलीत जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:35 PM2020-09-21T13:35:50+5:302020-09-21T13:37:21+5:30

दिवसेंदिवस कणकवली शहरात वाढणाऱ्या कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी रविवार पासून आठ दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे व्यापारी तसेच जनतेने निश्चित केले होते. त्याला सकाळपासूनच उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला .त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता.

corona virus: spontaneous response to curfew in Kankavali! | Coronavirus Unlock : कणकवलीत जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद!

कणकवली शहरात जनता कर्फ्यूमुळे रविवारी शुकशुकाट होता.

Next
ठळक मुद्देकणकवलीत जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद!बाजारपेठेत शुकशुकाट ; कोरोनाची पार्श्वभूमी

सुधीर राणे

कणकवली : दिवसेंदिवस कणकवली शहरात वाढणाऱ्या कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी रविवार पासून आठ दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे व्यापारी तसेच जनतेने निश्चित केले होते. त्याला सकाळपासूनच उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला .त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता.

केवळ महामार्ग चौपदरीकरण काम करणारे कामगार त्यांच्या कामाच्या ठिकाणी दिसून येत होते . सकाळच्या सत्रात दूध व वृत्तपत्र विक्री सुमारे दोन तास चालू होती . मात्र त्यानंतर सर्वत्र शुकशुकाट होता . रस्त्यांवर ठिकठिकाणी असणारा पोलीस बंदोबस्तही कुठेही दिसत नव्हता . मात्र, तरीही या जनता कर्फ्यूमध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसत होते .

प्रवासी उपलब्ध नसल्याने एसटी वाहतुकीवर परिणाम झालेला असला तरीही वाहतूक मात्र बंद नव्हती . रिक्षा संघटना ही बंद मध्ये सहभागी झाल्याने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना अडचणी येत होत्या . शहरातील एकही चहाची टपरी सुरू नसल्याने हॉटेलवर अवलंबून असणाऱ्याना चहा , नाश्ता , जेवणाच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.

शहरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने नागरिक , व्यापारी व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून हा निर्णय घेण्यात आला असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले होते. या आवाहनाला रविवारी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . नागरिकांनी घरीच रहाणे पसंत केले.

दरम्यान, सोमवारी शासकीय कार्यालये उघडणार असल्याने त्यादिवशीही नागरिक रविवार सारखाच जनता कर्फ्यू पाळतात का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

 

Web Title: corona virus: spontaneous response to curfew in Kankavali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.