corona virus : रामेश्वर मंदिरात शुकशुकाट, श्रावणी सोमवारीही भाविक नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 06:33 PM2020-08-01T18:33:30+5:302020-08-01T18:35:06+5:30
कणकवली तालुक्यातील नाटळ, भिरवंडे, सांगवे गावातील मंदिरांमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांवर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मंदिरात भाविकांची किरकोळ उपस्थिती दिसून आली.
कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ, भिरवंडे, सांगवे गावातील मंदिरांमध्ये श्रावणी सोमवारनिमित्त होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांवर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मंदिरात भाविकांची किरकोळ उपस्थिती दिसून आली.
दरवर्षी या गावांतील मंदिरांमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात फुगडी, भजने, हरिपाठ यांचे आयोजन करण्यात येते. तसेच नाटळ येथील श्री देव रामेश्वर मंदिरात दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. श्रावणी सोमवारनिमित्त मंदिराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. माहेरवाशिणी दरवर्षी देवीची ओटी भरण्यासाठी परगावातून गावात दाखल होतात.
मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समूह संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने हे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे सरपंचांकडून सांगण्यात आले. नाटळ येथील रामेश्वर मंदिराला सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी भेट देत श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले.
यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, भिरवंडेचे माजी सरपंच सावंत, संजय सावंत, नाटळ सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रदीप सावंत, शिवसेना कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.