corona virus : जिल्ह्यात येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 06:41 PM2020-09-03T18:41:02+5:302020-09-03T18:42:18+5:30
मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा खुल्या करण्यात येत आहेत. तथापी जिल्ह्यात येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिली.
सिंधुदुर्गनगरी : मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा खुल्या करण्यात येत आहेत. तथापी जिल्ह्यात येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिली.
व्हिडोओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, कोकण विभागीय आयुक्त आण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, जिल्ह्यात येणाऱ्या सर्व व्यक्तींचे जिल्ह्याच्या सीमेवर दक्षतेचा उपाय म्हणून फक्त थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक माहिती नोंदवून घेण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
नागरिकांमधून समाधान
राज्यात मंगळवार पासून ई-पास प्रणाली बंद करण्यात आली आहे. तसेच जिल्हा, राज्यअंतर्गत वाहतूक, प्रवास ही खुला केला आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा निर्णय घेण्यात आला. कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्हांतर्गत सीमा सील करण्यात आल्या होत्या. साधारणपणे मार्चपासून सीमा सील होत्या. तब्बल सहा महिन्यांनंतर जिल्ह्याच्या सीमा खुल्या होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.