corona virus : पोलीस अधिकाऱ्यासह तीन कर्मचारी पॉझिटिव्ह, सर्वाधिक रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 06:43 PM2020-08-31T18:43:30+5:302020-08-31T18:45:15+5:30
कणकवली : सिंधुदुर्गात रविवारी कोरोना बाधितांनी १५६ उच्चांकी आकडा गाठला आहे. त्यापैकी कणकवली तालुक्यात ३१ कोरोना बाधित रुग्ण सापडले. ...
कणकवली : सिंधुदुर्गात रविवारी कोरोना बाधितांनी १५६ उच्चांकी आकडा गाठला आहे. त्यापैकी कणकवली तालुक्यात ३१ कोरोना बाधित रुग्ण सापडले. त्यात एक पोलीस अधिकाऱ्यासह ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
त्यामुळे पोलिसांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण गेले काही दिवस पॉझिटिव्ह आलेले पोलीस अनेक पोलिसांच्या संपर्कात आले आहेत. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ४३७ वर पोहोचली आहे.
कणकवलीत पोलीस अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांनी खारेपाटण, फोंडा तपासणी नाका व रेल्वे स्टेशन येथे सेवा बजावली होती. सध्या एक पोलीस उपनिरीक्षक व ३ पोलिसांवर उपचार सुरु आहेत.यातील दोन पोलीस जिल्ह्या बाहेरुन काही दिवसांपूर्वी आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.तसेच एक पोलीस यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता .
आता कणकवली पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांचे स्वँब आरोग्य विभागाला घ्यावे लागणार आहेत. नव्याने ३१ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४३७ वर पोहचली आहे.
तालुक्यात शनिवारी रात्री ६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते , त्यात आज आणखी २५ जणांची भर पडली आहे . त्यामुळे एकूण ३१ कोरोना बाधित सापडले आहेत. फोंडाघाट गांगोवाडी येथील एका ६० वर्षीय वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
फोंडाघाट, गांगोवाडी येथे २७ जुलै रोजी मुंबई येथूून ते आले होते. त्यांचा कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला होता . गेल्या चार दिवसापासून त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते .