कोरोनाचा प्रभाव कमी, मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती 42 टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 02:27 PM2021-01-08T14:27:51+5:302021-01-08T14:33:17+5:30

CoronaVirus Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी कोरोनाबाबतची भीती मात्र कमी होत चालली आहे. परिणामी जिल्ह्यातील शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२.४२ टक्के एवढीच आहे. ४२ हजार ४२४ विद्यार्थी संख्येपैकी १८ हजार विद्यार्थी उपस्थित आहेत.

Corona's influence is low, but student attendance is 42 percent | कोरोनाचा प्रभाव कमी, मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती 42 टक्केच

कोरोनाचा प्रभाव कमी, मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती 42 टक्केच

Next
ठळक मुद्देकोरोनाचा प्रभाव कमी, मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती 42 टक्केच जिल्हाभरात एकूण २४७ शाळा, २१६ शाळा सुरू, ८७.४४ टक्के प्रमाण

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी कोरोनाबाबतची भीती मात्र कमी होत चालली आहे. परिणामी जिल्ह्यातील शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२.४२ टक्के एवढीच आहे. ४२ हजार ४२४ विद्यार्थी संख्येपैकी १८ हजार विद्यार्थी उपस्थित आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सुरुवातीच्या काळात याला पालक व विद्यार्थ्यांकडून फार कमी प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मात्र शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढले.

२४७ शाळांपैकी सध्या २१६ शाळा सुरू आहेत. हे प्रमाण ८७.४४ टक्के इतके आहे. तर उर्वरित शाळांमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सिंधुदुर्गात कमी झाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढतच नाही.

Web Title: Corona's influence is low, but student attendance is 42 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.