CoronaVirus: मुंबईहून आलेल्या मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; जिल्हा प्रशासनाची तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 03:02 PM2020-04-29T15:02:10+5:302020-04-29T15:05:02+5:30
कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या जिल्हावासीयांना धक्का
सिंधुदुर्ग: जिल्ह्यात १५ वर्षीय मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही मुलगी मुंबईतून २० एप्रिलला कुडाळ तालुक्यातील एका गावात आली होती. कोरोनामुक्तीकडे वाटचाल करताना सिंधुदुर्गात दुसरा रूग्ण आढळल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहेत.
चार दिवसापूर्वी मुंबईहून कुडाळ तालुक्यातील एका दुर्गम गावात आलेली १५ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ग्रीन झोनकडे वाटचाल करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने कुडाळ तालुक्यातील सह्याद्री पायथ्याशी असलेल्या एका गावात एक कुटुंब दाखल झाले होते. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यात पंधरा वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.