CoronaVirus : जिल्ह्यातील २२२ गावे जोखिमग्रस्त, साथीच्या आजारांत विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 03:16 PM2020-06-12T15:16:06+5:302020-06-12T15:20:06+5:30

जिल्हा आरोग्य विभागाने सन २०२०-२१ मधील जिल्ह्यातील जोखिमग्रस्त गावे निश्चित केली आहेत. मागील ३ वर्षे ज्या गावात लेप्टोस्पायरोसीस, जलजन्य साथीचे आजार उद्भवले आहेत अशी २२२ गावे प्रशासनाने जाहीर केली आहेत. या सर्व गावांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

CoronaVirus: 222 villages in the district at risk, special attention in epidemic diseases: District Health Department alert | CoronaVirus : जिल्ह्यातील २२२ गावे जोखिमग्रस्त, साथीच्या आजारांत विशेष लक्ष

CoronaVirus : जिल्ह्यातील २२२ गावे जोखिमग्रस्त, साथीच्या आजारांत विशेष लक्ष

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील २२२ गावे जोखिमग्रस्त, साथीच्या आजारांत विशेष लक्ष जिल्हा आरोग्य विभाग सतर्क

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा आरोग्य विभागाने सन २०२०-२१ मधील जिल्ह्यातील जोखिमग्रस्त गावे निश्चित केली आहेत. मागील ३ वर्षे ज्या गावात लेप्टोस्पायरोसीस, जलजन्य साथीचे आजार उद्भवले आहेत अशी २२२ गावे प्रशासनाने जाहीर केली आहेत. या सर्व गावांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

दरवर्षी जिल्हा आरोग्य विभाग पावसाळ्यात जोखिमग्रस्त गावे निश्चित करीत असतो. त्या गावात मागील ३ वर्षांत उद्भवलेल्या जलजन्य साथीच्या आजारांवर तो गाव जोखिमग्रस्त म्हणून जाहीर करतात. त्यानुसार लेप्टोस्पायरोसीसमध्ये वैभववाडी तालुक्यातील मांगवली, तिरवडे, कोकिसरे, देवगड तालुक्यातील गोवळ, गढीताम्हाणे, मुटाट, नाडण, कोटकामते, कुणकेश्वर, देवगड, जामसंडे, चाफेड; कणकवली तालुक्यातील शिवडाव, बोर्डवे, शिरवल, ओसरगाव, हळवल, वागदे, नाटळ, नरडवे, कोळोशी, नांदगाव, तरंदळे, साकेडी, कलमठ, वरवडे, जानवली, जांभुळगाव, साटमवाडी, कासार्डे; मालवण तालुक्यातील चिंदर, आचरा, त्रिंबक, पाडलोस, डांगमोडे, मर्डे, कोथेवाडा, धुरीवाडा, चाफेखोल, नांदरुख, मालवण शहर, किर्लोस, हिवाळे, ओवळीये, शिरवंडे, विरण, हेदूळ, चुनवरे, खोटले, सुकळवाड, कुसरवे, तळगाव, चाफेखोल यांचा समावेश आहे.

कुडाळ तालुक्यातील कालेली, हुमरस, आकेरी, ढोलकरगाव, नारूर, कुपवडे, आंबेरी, निवजे, कांदुळी, झाराप, आंबडपाल, किनळोस, बिबवणे, मिटक्याचीवाडी, मांडकुली, घावनळे, नेरूर, मुणगी, कुडगाव, चेंदवण, केळुस, वालावल, गावधड, अणाव, ओरोस, आंब्रड, कसाल, पोखरण, पडवे, हुमरमळा, रानबांबुळी, गावराई, कुंदे, कुडाळ, वेताळबांबर्डे, पावशी, बोरभाटवाडी, डिगस, सरंबळ, पिंगुळी, टेंबगाव, ओरोस खुर्द, जांभवडे, भूतवडे, वर्दे, पांग्रड, सोनवडे.

वेंगुर्ला तालुक्यातील आरवली, रेडी, परुळे, कालवी, निवती, होडावडा, तुळस, पाल, आरवली, उभादांडा, सुखटणगाव, वेंगुर्ला शहर, आवेरा, वजराठ, भंडारगाव, खानोली, राजापूरकरवाडी, मठ, वेतोरे, दाभोली. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, निगुडे, मडुरा, शेर्ले, बांदा, रोणापाल, नेतर्डे, सातोसे, गाळेल, कास, भिकेकोनाळ, पाडलोस, डिंगणे, आरोसबाग, आंबोली, चौकुळ, माडखोल, भोम, आरोस, तिरोडा, किनळे, आजगाव, आरोंदा, मळेवाड, सोनुर्ली, धाकोरा, कवठणी, वेर्ले, कुणकेरी, कोलगाव, सांगेली, कारिवडे, कलंबिस्त, शिरशिंगे, सावरवाड, मळगाव, ओटवणे, नेमळे, चराटे, निरवडे, तळवडे (कुंभारगाव).

दोडामार्ग तालुक्यातील सासोली, कसई, पाटये पुनर्वसन, पडवे, माजगाव, गिरोडे, गावठाण, आंबेरी, मणेरी, आडाळी, कळणे, उगाडे, डेगवे(मोयझर), पडवे, मोरगाव, तिलारी, निळेली, असनिये, तळकट, कुंब्रल, कुडासे, झोळंबे, भेकुर्ली, कोलझर, शिरवल, तांबुळी, भालावल, कोनशी, घारपी, पणतुर्ली, फुकेरी या गावांचा समावेश आहे.

जलजन्य साथग्रस्त गावे

देवगडमधील मणचे, कुणकेश्वर; वेंगुर्ल्यातील सोन्सुरे, शेळपी, वायंगणी या गावांचा जलजन्य साथग्रस्त गावात समावेश आहे. या गावांमध्ये विशेष काळजी घेण्यात येणार आहे. या गावात लेप्टोस्पायरोसीस किंवा जलजन्य साथीचे रुग्ण सापडू नयेत यासाठी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांचे विशेष लक्ष असेल.

Web Title: CoronaVirus: 222 villages in the district at risk, special attention in epidemic diseases: District Health Department alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.