CoronaVirus : सिंधुदुर्गात आणखी 9 कोरोनाबाधित सापडले; एकूण रुग्णसंख्या 130च्या वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:03 PM2020-06-08T18:03:54+5:302020-06-08T18:32:26+5:30
CoronaVirus : जिल्हा सामान्य रुग्णालयात आज प्राप्त अहवालामध्ये 9 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
कणकवली - कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, सिंधुदुर्गातही आज 9 कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील रुग्णसंख्या 127पर्यंत पोहोचली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आज प्राप्त अहवालामध्ये 9 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये (मळेवाड, ता. सावंतवाडी) येथील 1, तळगाव, मालवण येथील 1, आसोली, वेंगुर्ला 1, कणकवली तालुक्यातील तळेरे येथील 1 व घोणसरी येथील 2 व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनानं आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील बरेच कंटेन्मेंट झोन आहेत. मौजे हळवल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळवल नं. 1, मौजे कलमठ येथील जि. प. प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी, मौजे तळेरे, मौजे नाटळ, मौजे कुरंगवणे, मौजे नवीन कुर्ली वसाहत, मौजे जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, मौजे शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कूल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण आहेत. वैभववाडी तालुक्यात मौजे भुईबावडा गावातील बौद्धवाडी, पहिलीवाडी, तळीवाडी, मौजे वेंगसर गावातील बंदरकरवाडी, मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, उंबर्डे आणि मौजे कोकिसरे गावातील पालकरवाडी हे कंटेन्मेंट झोन आहेत. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावठणवाडी, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, मौजे निरवडे माळकरवाडी, मौजे बांदा गाव गवळीटेंबवाडी, मौजे असणिये येथील भट्टवाडी, धनगरवाडी, वायंगणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी, मौजे सातोसे-दुर्गवाडी या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.
कुडाळ तालुक्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती पुढील प्रमाणे आहे. मौजे उपवडे येथील दातारवाडी, पणदूर – मयेकरवाडी, आंब्रड गावची वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, मौजे पडवे गावची पडवे पहिलीवाडी, मौजे गावराई गावची टेंबवाडी, मौजे रानबांबूळी गावची पालकरवाडी, मौजे हिर्लोक गाव खालची परबवाडी, मौजे साळगाव लुभाटवाडी हे कंटेन्मेंट झोन आहेत. मालवण तालुक्यातील मौजे चिंदर येथील देऊळवाडी, गावडेवाडी, शाळा गावठाणवाडी, बागवाडी, गोसावी मठ, हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड हे कंटेन्मेंट झोन आहेत. देवगड तालुक्यातील मौजे शिरगाव मधील धोपटेवाडी, मौजे नाद मधील भोळेवाडी, मौजे नाडन येथील मिराशीवाडी येथे कंटेन्मेंट झोन आहेत. दोडामार्ग तालुक्यात मौजे कुंब्रल वराचा वाडा येथील जि.प.शाळा कुंब्रल नं. 1, मौजे कसई,, वनविभाग विश्रामगृह परिसर असे कंटेन्मेंट झोन आहेत.
कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध सद्यस्थिती – जिल्हा सिंधुदुर्ग
अ.क्र विषय संख्या
1 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 2609
2 अहवाल प्राप्त झालेले नमुने 2550
3 आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 130
4 निगेटीव्ह आलेले नमुने 2423
5 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 59
6 सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 102
7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 22
8 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2
9 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 123
10 आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 4299
11 संस्थात्म अलगीकरणातील व्यक्ती 21917
12 गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 20029
13 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 1491
14 2 मे 2020 रोजी पासून जिल्ह्यात आलेल्यांची संख्या 81938