coronavirus: कोरोनाबाधित परिचारिकेने केले मुलांवर उपचार, जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 03:21 PM2020-06-01T15:21:55+5:302020-06-01T15:51:36+5:30
कोविड वॉर्डमध्ये ड्युटी बजावल्यानंतर या परिचारिकेची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. मात्र तिचे रिपोर्ट येण्यापूर्वीच तिची चाईल्ड वॉर्डमध्ये ड्युटी लावण्यात आली. त्यामुळे सदर परिचारिकेने उपचार केलेल्या मुलांनाही संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्ग - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत शहरी भागांपूरता मर्यादित असलेला कोरोना विषाणू आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका परिचारिकेने अनावधानाने चाईल्ड वॉर्डमधील मुलांवर उपचार केल्याचे समोर आले आहे. या कोविड वॉर्डमध्ये ड्युटी बजावल्यानंतर या परिचारिकेची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. मात्र तिचे रिपोर्ट येण्यापूर्वीच तिची चाईल्ड वॉर्डमध्ये ड्युटी लावण्यात आली. त्यामुळे सदर परिचारिकेने उपचार केलेल्या मुलांनाही संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी या प्रकराबाबत संताप व्यक्त केला आहे.
नितेश राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिल्हा रुग्णालयातील या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत. नितेश राणे म्हणाले की, संबंधित परिचारिकेला स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत क्वारेंटाइन करणे आवश्यक होते. मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच संबंधित नर्सला चाईल्ड वॉर्डमध्ये ड्युटी देऊन तेथील लहान मुलांचे आरोग्य सिव्हील सर्जननी धोक्यात घातले आहे. डॉ. चाकूरकर यांच्या भोंगळ कारभागामुळे समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
As per Info..nurse who worked in civil hospital Sindhdurg gets symptoms of COVID..takes a test..as usual the test took 8 to 9 days..till then she kept working in the ward full of small children..her report is POSITIVE!
— nitesh rane (@NiteshNRane) June 1, 2020
If this info is true then C.S Sindhdurg shud be punished !
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गातील कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे ५० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
This is a very disturbing case as this will only lead to community spreading in Sindhdurg !
— nitesh rane (@NiteshNRane) June 1, 2020
All the children’s lives who she has come in contact with can be at risk n this can lead to a big risk for everyone!