CoronaVirus : वेंगुर्ला शहरातील १४ हजार नागरिकांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 03:39 PM2020-06-06T15:39:11+5:302020-06-06T15:40:19+5:30

वेंगुर्ला शहरातील क्वारंटाईन व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी तसेच इतरही नागरीकांना संसर्गाचा धोका कमी व्हावा या उद्देशाने वेंगुर्ला शहरातील ४५०० कुटुंबातील सुमारे १४ हजार नागरिकांना अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधाचे घरोघरी वाटप करण्यात आले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार अशा प्रकारचे होमिओपॅथी औषध वाटप करणारी वेंगुर्ला नगरपरिषद पहिली नगरपरिषद ठरली असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.

CoronaVirus: Homeopathy pills distributed to 14,000 citizens of Vengurla | CoronaVirus : वेंगुर्ला शहरातील १४ हजार नागरिकांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

अर्सेनिक अल्बम गोळ्यांच्या वितरण शुभारंभप्रसंगी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी माहिती दिली. यावेळी सोबत नगरसेवक व अन्य उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देवेंगुर्ला शहरातील १४ हजार नागरिकांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटपऔषध वाटप करणारी वेंगुर्ला नगरपरिषद पहिली

वेंगुर्ला : शहरातील क्वारंटाईन व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी तसेच इतरही नागरीकांना संसर्गाचा धोका कमी व्हावा या उद्देशाने वेंगुर्ला शहरातील ४५०० कुटुंबातील सुमारे १४ हजार नागरिकांना अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधाचे घरोघरी वाटप करण्यात आले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार अशा प्रकारचे होमिओपॅथी औषध वाटप करणारी वेंगुर्ला नगरपरिषद पहिली नगरपरिषद ठरली असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.

वेंगुर्ला शहरातील नागरीकांच्या आरोग्याचे हित जोपासण्याला नगरपरिषदेने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या कामी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व प्रशासकीय कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांचे नगराध्यक्ष गिरप यांनी आभार मानले.

स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत जसे सर्वांनी एकजुटीने काम करुन यश मिळविले त्याच पद्धतीने सर्वांची एकजूट कायम राखत कोरोनासारख्या जागतिक संकटावर आपण मात करु असा ठाम विश्वासही नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केला.

 

Web Title: CoronaVirus: Homeopathy pills distributed to 14,000 citizens of Vengurla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.