CoronaVirus Lockdown :चिरेखाणीवरच्या कामगारांच्या पेटल्या चुली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:14 PM2020-04-03T17:14:45+5:302020-04-03T17:16:24+5:30

संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्यावतीने १५ दिवसासाठी लागणारा किराणा माल, धान्य,भाज्या उपलब्ध करून दिल्या.पोलीस ठाण्यातच निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत अन्नधान्याचे वाटप त्या कामगारांना केले. त्यामुळे चिरेखाणीवरच्या कामगारांच्या चुली पुन्हा पेटल्या आहेत.

CoronaVirus Lockdown: | CoronaVirus Lockdown :चिरेखाणीवरच्या कामगारांच्या पेटल्या चुली !

कणकवली पोलीस ठाणे येथे उपाशी असलेल्या कामगारांना अन्नधान्याचे वाटप पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देउपाशी असलेल्या कामगारांना संदीप मेस्त्री मित्रमंडळाने दिले अन्नधान्य कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी घेतला पुढाकार

सुधीर राणे

कणकवली  : 'आम्ही चिरेखाणीवर रोजंदारी वर काम करतो.. धान्य साठा संपला आहे...झोपडीत आता अन्नाचा कणसुद्धा नाही...'एकतर आम्हाला धान्य द्या , नाहीतर गावी जाण्याची परवानगी द्या . अशी कौफिय असरोंडी येथील एका चिरेखाणीवर काम करणाऱ्या दहा कामगारांनी कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे मांडली. ही गोष्ट कणकवली कलमठ येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कळली.

त्यांनी संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्यावतीने १५ दिवसासाठी लागणारा किराणा माल, धान्य,भाज्या उपलब्ध करून दिल्या.पोलीस ठाण्यातच निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत अन्नधान्याचे वाटप त्या कामगारांना केले. त्यामुळे चिरेखाणीवरच्या कामगारांच्या चुली पुन्हा पेटल्या आहेत.

कणकवली तसेच मालवण तालुक्याच्या सिमेवरील असरोंडी गावातील चिरेखाण काम करणारे १० कामगार किराणा माल नसल्याने कणकवली पोलिस स्थानकांत गावी जाण्यासाठी परवानगी मागण्यासाठी आले होते. संचारबंदी असल्याने आहे त्या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे . मात्र, चिरेखाणीच्या ठिकाणी राव्हायचे असेल तर या कामगारांकडे अन्न नव्हते. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्या कामगारांनी कणकवली पोलीस ठाणे गाठले.

पोलीस ठाण्यात झालेली गर्दी पाहून काही कार्यकर्ते तेथे गेले असता त्यांना कामगारांची समस्या लक्षात आली . या गरजूंना मदतीचा हात देत संदीप मेस्त्री मित्रमंडळाने पंधरा दिवस पुरेल इतके धान्य उपलब्ध करून दिले . तसेच माणुसकीचे दर्शन घडविले.

कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत त्या दहा गरजूंना मदत वितरित करण्यात आली.यावेळी संदीप मेस्त्री,पोलिस पाटिल संतोष जाधव, नितिन पवार, विट्ठल चव्हाण,अभी साटविलकर,समीर कवठणकर, केतन दळवी आदी उपस्थित होते.

 

Web Title: CoronaVirus Lockdown:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.