CoronaVirus Lockdown : फुलून येणारे धबधबे पर्यटकांअभावी सुने-सुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 04:46 PM2020-06-15T16:46:29+5:302020-06-15T16:49:55+5:30

पावसाळा सुरू होताच पर्यटकांचा ओघ डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यांकडे वळू लागतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगड तालुक्यातील तळवडे-न्हावनकोंड व मणचे व्याघे्रश्वर हे धबधबे पर्यटकांबरोबर स्थानिकांना पर्वणीच ठरत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी फुलून येणारे हे धबधबे पर्यटकांअभावी सुने-सुने दिसत आहेत.

CoronaVirus Lockdown: Lockdown causes waterfalls to turn golden | CoronaVirus Lockdown : फुलून येणारे धबधबे पर्यटकांअभावी सुने-सुने

CoronaVirus Lockdown : फुलून येणारे धबधबे पर्यटकांअभावी सुने-सुने

Next
ठळक मुद्दे पर्यटकांनी फुलून येणारे धबधबे पर्यटकांअभावी सुने-सुने देवगड तालुक्यातील तळवडे-न्हावनकोंड, मणचे व्याघे्रश्वर धबधबे निवांत

अयोध्याप्रसाद गावकर 

देवगड : पावसाळा सुरू होताच पर्यटकांचा ओघ डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यांकडे वळू लागतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगड तालुक्यातील तळवडे-न्हावनकोंड व मणचे व्याघे्रश्वर हे धबधबे पर्यटकांबरोबर स्थानिकांना पर्वणीच ठरत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी फुलून येणारे हे धबधबे पर्यटकांअभावी सुने-सुने दिसत आहेत.

उन्हाळा संपल्यानंतर पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीलाच हजेरी लावली. जून महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस सुरू झाल्याने निसर्गाचे सौंदर्य खऱ्या अर्थाने फुलू लागले. सध्याच्या दगदगीच्या जीवनात प्रत्येकाला निवांतपणे आनंदात कसे जगता येईल अशी क्षणभर विश्रांती हवी असते.

आठवड्याच्या कामाचा ताणतणाव दूर करण्यासाठी गावात किंव एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात सुटी घालवायला प्रत्येकालाच आवडते. हिरवीगार झाडे, चहूकडे पसरलेली हिरवळ, वेगवेगळे पक्षी आणि खळाळणारा धबधबा असे मनमोहक रुप डोळ्यासमोर दिसताच दिवसभराचा थकवा कधी गायब होतो हे कळतच नाही, असे येथील धबधबा पाहताना अनुभवास येते. मात्र, यावर्षी पर्यटकांना अनोखी पर्वणी ठरणारे धबधबे लॉकडाऊनमुळे पर्यटकच येत नसल्याने सुने-सुने दिसत आहेत.

तळवडे येथील न्हावनकोंड धबधबा हा अल्पावधीतच मोठ्या प्रमाणा प्रसिद्धी मिळालेला व पर्यटकांना आकर्षित करणारा धबधबा ठरला आहे. अतिशय सुंदर, सुरक्षित व रस्त्याच्या नजीकच असलेला व पर्यटन निधीतून विकसित करण्यात आलेल्या या धबधब्याकडे येथील स्थानिकांसह पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

मणचे येथील व्याघे्रश्वरच्या धबधब्यावरही पर्यटक व स्थानिकांची रेलचेल कायमच असते. तसेच तालुक्यातील पावसाच्या पाण्यावरती प्रवाहित झालेल्या ओहोळावरती व तलावांमध्येही मनसोक्तपणे आनंद लुटण्यासाठी स्थानिकांची गर्दी दिसून येते.

समुद्रकिनारी मनसोक्तपणे आनंद घेणाऱ्या पर्यटकांचा ओढा पावसाळ्यामध्ये साहजिकच धबधब्यांकडे वळतो. विशेषत: शनिवार-रविवारी सुटीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी दिसून येते. या धबधब्यांवर मनसोक्तपणे भिजताना पर्यटकांना विशेष आनंद होतो. धबधब्याच्या ठिकाणी भोजनाचाही कार्यक्रम आयोजित केला जातो.

मात्र, यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने लोक अद्यापही घरीच आहेत. बाहेर पडताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आदेश असल्याने या धबधब्यांकडे पर्यटक येत नाहीत. याशिवाय शासनाने अनेक धबधबे बंद ठेवावेत, असे आदेशही काढल्याने पर्यटक नाराज झाले आहेत. त्यामुळे हे धबधबे सुने-सुने वाटत आहेत.

Web Title: CoronaVirus Lockdown: Lockdown causes waterfalls to turn golden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.