CoronaVirus Lockdown :हे सरकार परप्रांतियांचे आहे का : वैभव खेडेकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:56 PM2020-05-12T17:56:04+5:302020-05-12T18:06:20+5:30

युपी, बिहारमधील नागरिकांसाठी सरकार मोफत रेल्वे सोडते. मात्र, कोकणात येणाऱ्या जनतेकडून दामदुप्पट पैसे घेतले जातात. हा कोकणी जनतेवर अन्याय आहे. हे सरकार परप्रांतियांचे आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे.

CoronaVirus Lockdown: Vaibhav Khedekar's question whether this government belongs to foreigners | CoronaVirus Lockdown :हे सरकार परप्रांतियांचे आहे का : वैभव खेडेकर यांचा सवाल

CoronaVirus Lockdown :हे सरकार परप्रांतियांचे आहे का : वैभव खेडेकर यांचा सवाल

googlenewsNext
ठळक मुद्देहे सरकार परप्रांतियांचे आहे कावैभव खेडेकर यांचा सवाल

खेड : युपी, बिहारमधील नागरिकांसाठी सरकार मोफत रेल्वे सोडते. मात्र, कोकणात येणाऱ्या जनतेकडून दामदुप्पट पैसे घेतले जातात. हा कोकणी जनतेवर अन्याय आहे. हे सरकार परप्रांतियांचे आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे.

मुंबईतून कोकणात येणाऱ्या नागरिकांकडून तिकिटाचे जास्त पैसे घेत असल्याच्या प्रकारावरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन होऊन आता जवळजवळ दीड महिना होईल. या काळात आपण अनेक संघर्षाला तोंड देत इथपर्यंत आलो आहोत. आता यापुढील काळ अधिक जबाबदारीचे आहेत.

मुंबईकर बांधव आता हळूहळू आपल्या गावी येत आहेत. त्यांची योग्यती वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मुंबईत राहणाऱ्या लोकांनी दीड महिन्यात खूप अडचणीत दिवस काढले आहेत. दीड महिन्यात कोणताही रोजगार नाही, हातातील पैसे संपले, घरातील धान्य संपल. काहीजण चालत आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, सरकार रोज नवनवीन नियम काढत आहे. पण त्याचू अंमलबजावणी होत नाही. सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. परिवहमंत्री अनिल परब यांनी जाहीर केल की. लोकांसाठी एस. टी. प्रवास मोफत होईल. तर त्यांच्या सचिवांनी रात्रीच हा निर्णय फिरवला आणि कोकणातील जनतेला प्रति सीटमागे २ हजार रुपये आर्थिक भुर्दंड पडणार आहे.

मला सरकारला विचारायच आहे की, हे परप्रांतियांचे सरकार आहे का? युपी, बिहारमधील जनतेसाठी मोफत रेल्वे सेवा दिलीत. खाण्यापिण्याची व्यवस्था केलीत जे आपले मतदारही नाहीत. माझा कोकणी माणूस आपल्या पारड्यात भरभरून मत टाकतो. मग त्याला २ हजार रुपयांचा भुर्दंड का, असा सवाल खेडेकर यांनी केला आहे.

त्याचबरोबर इथ आल्यानंतरही त्यांना त्रास सहन करावा लागतो. इथ आल्यानंतर तासनतास त्यांना स्वॅबसाठी रांगेत उभ राहावा लागत. काहींना सोडल जात, काहींना तिथेच ठेवल जात. सरकार आणि अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. सरकारच अधिकारी ऐकत नाहीत हे अधिकारी सुप्रीम पॉवर असल्यासारखे वागत आहेत.

कोरोनाचा सामना करत असताना अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. सरकारचा अजिबात वचक नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईतून येणाऱ्या प्रत्येकाला मोफत एस. टी. सेवा पुरवावी. अन्यथा भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला भुर्दंड सोसावा लागेल, असा इशाराही वैभव खेडेकर यांनी दिला आहे.
 

Web Title: CoronaVirus Lockdown: Vaibhav Khedekar's question whether this government belongs to foreigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.