CoronaVirus News: सिंधुदुर्गात 95 सक्रिय रुग्ण; आतापर्यंत 32 जणांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 05:21 PM2020-06-09T17:21:41+5:302020-06-09T17:22:25+5:30

कट्टा, मालवण येथील 1, मळेवाड, सावंतवाडी येथील एक आणि ओवळीये सावंतवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. 

CoronaVirus News: 95 active patients in Sindhudurg; So far 32 have beaten Corona | CoronaVirus News: सिंधुदुर्गात 95 सक्रिय रुग्ण; आतापर्यंत 32 जणांची कोरोनावर मात

CoronaVirus News: सिंधुदुर्गात 95 सक्रिय रुग्ण; आतापर्यंत 32 जणांची कोरोनावर मात

Next

कणकवली- जिल्ह्यात सद्या 95 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 130 बाधित रुग्णांपैकी 32 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 1 रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयास काल  8 जून 2020 रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालामध्ये 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये कट्टा, मालवण येथील 1, मळेवाड, सावंतवाडी येथील एक आणि ओवळीये सावंतवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. 

जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील पुढीलप्रमाणे कंटेन्मेंट झोन आहेत. मौजे धालवली मधील धनगरवाडी, मौजे घोणसरी येथील पिंपळवाडी, मौजे हळवल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळवल नं. 1, मौजे कलमठ येथील जि.प. प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी, मौजे तळेरे, मौजे नाटळ, मौजे कुरंगवणे, मौजे नवीन कुर्ली वसाहत, मौजे जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, मौजे शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कुल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण. वैभववाडी तालुक्यात मौजे भूईूबावडा गावातील बौद्धवाडी, पहिलीवाडी, तळीवाडी, मौजे वेंगसर गावातील बंदरकरवाडी, मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, उंबर्डे आणि मौजे कोकिसरे गावातील पालकरवाडी हे कंटेन्मेंट झोन आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील मौजे मळेवाड – माळकरवाडी येथील जि.प. शाळा नं. 2,  कारिवडे गावठणवाडी, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, मौजे निरवडे माळकरवाडी, मौजे बांदा गाव गवळीटेंबवाडी, मौजे असणिये येथील भट्टवाडी, धनगरवाडी, वायंणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी,  मौजे सातोसे-दुर्गवाडी या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.  कुडाळ तालुक्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती पुढील प्रमाणे आहे. मौजे उपवडे येथील दातारवाडी, पणदूर – मयेकरवाडी, आंब्रड गावची वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, मौजे पडवे गावची पडवे पहिलीवाडी, मौजे गावराई गावची टेंबवाडी, मौजे रानबांबूळी गावची पालकरवाडी, मौजे हिर्लोक गाव खालची परबवाडी, मौजे साळगाव लुभाटवाडी  हे कंटेन्मेंट झोन आहेत.

मालवण तालुक्यातील मौजे चिंदर येथील देऊळवाडी, गावडेवाडी, शाळा गावठाणवाडी, बागवाडी, गोसावी मठ,  हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील मौजे आसोली – फणसखोलवाडी,  मातोंड हे कंटेन्मेंट झोन आहेत. देवगड तालुक्यातील मौजे किंजवडे येथील आदर्श विद्यालय,  मौजे शिरगाव मधील धोपटेवाडी, मौजे नाद मधील भोळेवाडी, मौजे नाडन येथील मिराशीवाडी येथे कंटेन्मेंट झोन आहेत. दोडामार्ग तालुक्यात मौजे कुंब्रल वराचा वाडा येथील जि.प.शाळा कुंब्रल नं. 1, मौजे कसई,, वनविभाग विश्रामगृह परिसर असे कंटेन्मेंट झोन आहेत.  जिल्ह्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम व धार्मिक स्थळे बंदच राहणात आहेत. राज्य शासनाकडून पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर याविषयी निर्णय घेण्यात येईल. 

अ.क्र    विषय    संख्या
1    पाठविण्यात आलेले एकूण नमुने    2670
2    अहवाल प्राप्त झालेले नमुने    2595
3    आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने    130
4    निगेटीव्ह आलेले नमुने    2465
5    अहवाल प्राप्त न झालेले नमुने    75
6    सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण    95
7    डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण    32
8    मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या    2
9    विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण    118
10    आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती    5413
11    संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती    21775
12    शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती    357
13    गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती    19891
14    नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती    1527
15    2 मे 2020 रोजी पासून जिल्ह्यात आलेल्यांची संख्या    83846

Web Title: CoronaVirus News: 95 active patients in Sindhudurg; So far 32 have beaten Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.