CoronaVirus : डॉक्टरांना समान वेतन देण्याची निरंजन डावखरे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:55 PM2020-06-02T13:55:19+5:302020-06-02T13:56:31+5:30

राज्याच्या कानाकोपऱ्यात कोविड-१९ च्या आपत्तीत एमबीबीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर कोविड योद्धे म्हणून खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने एमबीबीएस डॉक्टरांप्रमाणेच सर्व डॉक्टरांना समान वेतन द्यावे, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

CoronaVirus: Niranjan Davkhare demands equal pay for doctors | CoronaVirus : डॉक्टरांना समान वेतन देण्याची निरंजन डावखरे यांची मागणी

CoronaVirus : डॉक्टरांना समान वेतन देण्याची निरंजन डावखरे यांची मागणी

Next
ठळक मुद्देडॉक्टरांना समान वेतन देण्याची निरंजन डावखरे यांची मागणीआमदार निरंजन डावखरे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग : राज्याच्या कानाकोपऱ्यात कोविड-१९ च्या आपत्तीत एमबीबीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर कोविड योद्धे म्हणून खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने एमबीबीएस डॉक्टरांप्रमाणेच सर्व डॉक्टरांना समान वेतन द्यावे, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोविड-१९ मुळे आपल्या जीवावरील धोका न पाहता जनसामान्यांच्या जीवनासाठी सर्व डॉक्टरांची धडाडी कौतूकास्पद आहे. राज्य सरकारने केवळ एमबीबीएस डॉक्टरांना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, बीएएमएस व बीएचएमएस डॉक्टरांना वगळण्यात आले. या काळातच कंत्राटी तत्वावर राष्ट्रीय आरोग्य अभियान व ैआरबीएसके' अंतर्गत बीएएमएस डॉक्टरही कर्तव्य बजावित आहेत. विशेषत: ग्रामीण भागात कार्यरत डॉक्टरांची संख्या लक्षणीय आहे. या सर्व डॉक्टरांना न्याय देण्याची गरज आहे, असे आमदार डावखरे यांनी पत्रात म्हटले आहे.

समान काम समान वेतन' या तत्वावर एमबीबीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस डॉक्टरांना समान वेतन देणे गरजेचे आहेत. यापूर्वी राज्य सरकारने बंधपत्रित कंत्राटी डॉक्टरांना भरीव वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, बीएएमएस व बीएचएमएस पदवीधारक कंत्राटी डॉक्टरांना वगळण्यात आले. तरी राज्य सरकारने सहानुभुतीपूर्वक निर्णय घेऊन सर्व डॉक्टरांना समान वेतन देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Web Title: CoronaVirus: Niranjan Davkhare demands equal pay for doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.