CoronaVirus : जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 68, सक्रिय रुग्ण 77

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 04:22 PM2020-06-13T16:22:29+5:302020-06-13T16:26:42+5:30

जिल्ह्यातील आणखी 12 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रुग्णालयातून आज आणखी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 68 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

CoronaVirus: The number of cured patients in the district is 68, currently active patients 77 | CoronaVirus : जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 68, सक्रिय रुग्ण 77

CoronaVirus : जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 68, सक्रिय रुग्ण 77

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 68, सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण 77ट्रुनॅट मशीनद्वारे आतापर्यंत 190 व्यक्तींची तपासणी

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील आणखी 12 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रुग्णालयातून आज आणखी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 68 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोवीड झ्र 19 च्या तपासणीसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या ट्रुनॅट मशीन द्वारे आतापर्यंत 190 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सदर मशीनद्वारे दिनांक 9 जून 2020 रोजी पासून जिल्ह्यात कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. सद्या जिल्ह्यात दोन ट्रुनॅट मशीन आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून एक ट्रुनॅट मशीन प्राप्त झाल्यामुळे तपासणीचा वेग वाढला आहे.
 

  • पाठविण्यात आलेले एकूण नमुने 2,957
  • अहवाल प्राप्त झालेले नमुने  2,794
  • आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 149
  • निगेटीव्ह आलेले नमुने 2,645
  • अहवाल प्राप्त न झालेले नमुने 149
  • सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 77
  • डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 68
  • मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3
  • विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 112
  • आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 3,995
  • संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 25,495
  • शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 198
  • गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 23,628
  • नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 1,669
  • दि. 2 मे 2020 रोजी पासून जिल्ह्यात आलेल्यांची संख्या 90,768

Web Title: CoronaVirus: The number of cured patients in the district is 68, currently active patients 77

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.