CoronaVirus ...तर सिंधुदुर्ग रेड झोनमध्ये जाईल; नितेश राणे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 10:19 PM2020-05-05T22:19:26+5:302020-05-05T22:21:03+5:30

आज नव्याने सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालक आहे. सदर रुग्ण हा दिनांक २४ एप्रिल  रोजी मुंबई येथून परत आला होता.

CoronaVirus then Sindhudurg will go into the red zone; Nitesh Rane got angry hrb | CoronaVirus ...तर सिंधुदुर्ग रेड झोनमध्ये जाईल; नितेश राणे संतापले

CoronaVirus ...तर सिंधुदुर्ग रेड झोनमध्ये जाईल; नितेश राणे संतापले

Next

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मंगळवारी नव्याने आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला आहे. यावरून कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला फैलावर घेतले आहे. राज्य सरकारने चाकरमान्यांचा काय तो एकदाच निर्णय घ्यावा असे म्हणणाऱ्या राणेंनी ग्रीन झोन जाणार असल्याचा इशारा दिला आहे. 


आज नव्याने सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालक आहे. सदर रुग्ण हा दिनांक २४ एप्रिल  रोजी मुंबई येथून परत आला. त्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. मुंबई येथील हॉटस्पॉटमधून आल्यामुळे त्याचा दिनांक २ मे रोजी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आता त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील या रुग्णाचे गाव कॉन्टेन्मेंट झोन केले असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. 


यावरून नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे जिल्ह्यात आणखी एक रुग्ण सापडला आहे. त्याला प्रशासनाने घरी सोडले होते, असे समजत आहे. आंबा वाहतूक करणाऱ्या चालकांबाबत सांगूनही लक्ष दिले नाही. ग्रीन झोनचे स्वप्न पाहणारा आमचा जिल्हा रेड झोनकडे वाटचाल करत आहे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. 

 

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus रत्नागिरी जिल्हा रेड झोनच्या दिशेने; आज ४ रुग्ण सापडले

CoronaVirus बापरे! राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येत मुंबईचा मोठा वाटा; दिवसभरात ३४ बळी

चिंताजनक! मुंबईवर कोरोनाचे वाढते संकट; दिवसभरात ६३५ नवे कोरोनाग्रस्त

CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ

चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

Web Title: CoronaVirus then Sindhudurg will go into the red zone; Nitesh Rane got angry hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.