CoronaVirus :वैभववाडी तालुक्यात दोन होम क्वारंटाईन व्यक्तींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 03:41 PM2020-06-13T15:41:39+5:302020-06-13T15:48:24+5:30

गृह विलगीकरणात असलेल्या दोन व्यक्तींचा तालुक्यात शुक्रवारी मृत्यू झाला आहे. प्रभादेवी शंकर राशिवटे (८५, रा. करूळ भोयडेवाडी) आणि शेखर जगन्नाथराव कोलते (६७, सध्या रा. एडगाव, मुळगाव जळगाव) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. गृह विलगीकरणात तालुक्यात मृत्यू झालेल्यांचा आकडा चारवर पोहोचला आहे.

CoronaVirus: Two home quarantine deaths in Vaibhavwadi taluka | CoronaVirus :वैभववाडी तालुक्यात दोन होम क्वारंटाईन व्यक्तींचा मृत्यू

CoronaVirus :वैभववाडी तालुक्यात दोन होम क्वारंटाईन व्यक्तींचा मृत्यू

Next
ठळक मुद्देवैभववाडी तालुक्यात दोन होम क्वारंटाईन व्यक्तींचा मृत्यूगृह विलगीकरणात मृत्यू झालेल्यांचा आकडा चारवर

वैभववाडी : गृह विलगीकरणात असलेल्या दोन व्यक्तींचा तालुक्यात शुक्रवारी मृत्यू झाला आहे. प्रभादेवी शंकर राशिवटे (८५, रा. करूळ भोयडेवाडी) आणि शेखर जगन्नाथराव कोलते (६७, सध्या रा. एडगाव, मुळगाव जळगाव) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. गृह विलगीकरणात तालुक्यात मृत्यू झालेल्यांचा आकडा चारवर पोहोचला आहे.

प्रभादेवी राशिवटे या या गेल्या शनिवारी नातेवाईकांसोबत मुंबईहून गावी आल्या होत्या. त्या दीर्घ काळापासून एका आजाराने त्रस्त होत्या. या आजारातच त्यांचा मृत्यू झाल्याचे विभागाने स्पष्ट केले. तर शेखर हे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गालगत एडगाव-करुळ दरम्यानच्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाले होते. त्यांना शुक्रवारी हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मृतांच्या नातेवाईकांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शेखर कोलते यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सून असा परिवार आहे

Web Title: CoronaVirus: Two home quarantine deaths in Vaibhavwadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.