सावंतवाडीत वाॅटर एटीएममध्ये भ्रष्टाचार; तीन लाखाच्या एटीएमची साडे नऊ लाखात खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:51 PM2021-04-15T20:51:42+5:302021-04-15T20:52:44+5:30

Corruption : भ्रष्टाचार करण्यात झाल्याचा आरोप शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी केला आहे.

Corruption in water ATMs in Sawantwadi; Purchase of three lakh ATMs for nine and a half lakhs | सावंतवाडीत वाॅटर एटीएममध्ये भ्रष्टाचार; तीन लाखाच्या एटीएमची साडे नऊ लाखात खरेदी

सावंतवाडीत वाॅटर एटीएममध्ये भ्रष्टाचार; तीन लाखाच्या एटीएमची साडे नऊ लाखात खरेदी

googlenewsNext
ठळक मुद्देसभागृहात या विषयावर चर्चा झाली असून याबाबतची निर्विदा प्रकिया आम्ही करत असलो तरी नगरविकास दर निश्चित करत असतो पण आपली तक्रार असल्यास बिल आदा केले जाणार नसल्याचे नगराध्यक्ष परब यानी लोबो यांना सागितले. 

सावंतवाडीत -सावंतवाडी नगरपालिकेने खरेदी केलेल्या वाॅटर एटीएममध्ये लाखो रूपयांचा भ्रष्टाचार असून हे एटीएम बाहेर तीन लाख रूपयाना एक मिळते मात्र तेच नगरपालिकेने  9 लाख 27 हजार रूपयाप्रमाणे तीन एटीएम  29 लाख 50 हजार रूपयांना खरेदी केल्याने यात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात झाल्याचा आरोप शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी केला आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


सावंतवाडी नगरपालिकेने शहरातील तीन ठिकाणी वाॅटर एटीएम बसवली आहेत यात मच्छी मार्केट मुख्य भाजी मार्केट तसेच उद्यानात अशी तीन वाॅटर एटीएम म्हणजे एक रूपया भरून एक ग्लास पाणी या एटीएम मधून मिळणार आहे.यासाठी नगरपालिकेच्या स्थायी समितीत हा प्रस्ताव आणण्यात आला व याला स्थायीची मंजूरी घेण्यात आली. यावेळी स्थायीमध्ये शहरात तीन एटीएम बसविण्यासाठी 29लाख 50 हजार रूपयाच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. त्या प्रमाणे निविदा प्रकिया करून शहरातील या तीन ठिकाणी ही एटीएम बसविण्यात ही आली आहेत.
मात्र लोबो यांनी सदर एटीएम ची सखोल चौकशी केली असता हे बाहेर एका एटीएम ची किंमत 47 हजार रूपयांना मिळते पण येथे ते सुस्थीतीत उभारण्यात आल्याने त्याचा खर्च प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत जाईल अशी शक्‍यता लोबो यांनी व्यक्त केली. मात्र, एकदमच ते 9 लाख 27 हजार रूपयांना हे एक एटीएम खरेदी केल्याने धक्काच बसला असून नागरिकांचा पैसा असा वाया घालवू देणार नाही असा इशारा लोबो यानी दिला असून खरेदीचे बिल देण्यास विरोध केला आहे. दरम्यान सभागृहात या विषयावर चर्चा झाली असून याबाबतची निर्विदा प्रकिया आम्ही करत असलो तरी नगरविकास दर निश्चित करत असतो पण आपली तक्रार असल्यास बिल आदा केले जाणार नसल्याचे नगराध्यक्ष परब यानी लोबो यांना सागितले. 

नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार: लोबो
 

या संपूर्ण व्यवहारांची सखोल चौकशी होण्यासाठी नगरविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. याबाबत आम्ही आमदार दीपक केसरकर यांना विनंती केल्याचे लोबो यांनी सांगितले.

Web Title: Corruption in water ATMs in Sawantwadi; Purchase of three lakh ATMs for nine and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.