समुद्रकिनारी जमिनीला कोटीचा भाव, वर्षभरात २५ टक्क्यांनी वाढले दर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 04:06 PM2023-01-12T16:06:50+5:302023-01-12T16:07:28+5:30
रस्त्याशेजारी, समुद्रकिनाऱ्यावर दुप्पट भाव
अनंत जाधव
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिक साधन संपत्तीने वेढलेला असा आहे येथे मालकी क्षेत्र जेवढे आहे तेवढेच वनक्षेत्र आहे.त्यामुळे फळ बागायती असो किंवा पावसाळी शेती असो येथे मोठ्याप्रमाणात होत असते.येथील फळ बागायती जमिनीचे दर हे मोठे आहेत.
त्या तुलनेत शेत जमिन ही कमी दराने विक्री केली जातो बांदा दोडामार्ग तालुक्यात तर नैसर्गिक साधन संपत्ती ही असल्याने तेथील जमिनीला विशेष मागणी असून तेथील जमिनीचे दर ही जास्त आहेत.पण दोडामार्ग तालुक्यातील काही गावांमध्ये दोन ते तीन लाख रुपये एकरी भावानेही जमीन विक्री केली जाते तर समुद्रकिनारी असलेल्या जमिनीचा दर हा उच्चांकी असून तिप्पट ते चौपट भावाने या जमिनी विकल्या जात आहेत.
कोणत्या तालुक्यात शेतीला काय भाव (एकरी)
तालुका जिरायती बागायती
सावंतवाडी 3 लाख 5 लाख
कणकवली 4 लाख 7 लाख
कुडाळ 2.5 लाख 6 लाख
दोडामार्ग 3.5 लाख 8 लाख
सर्वाधिक दर समुद्र किनारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिनीला सर्वाधिक भाव हा समुद्रकिनारी असून वेंगुर्ला मालवण तालुक्यात अनेक समुद्रकिनाऱ्यावर जमिनीचे भाव हे एकरी मागे एक ते दोन कोटीमध्ये आकारले जातात
सर्वात कमी दर 'या' तालुक्यात
जमिनीला सर्वाधिक कमी भाव हा दोडामार्ग व वैभववाडी तालुक्यात असून या तालुक्यातील काहि गावांमध्ये तर जमिनीचा दर एकरी दर दोन ते तीन लाखा एवढा खाली आला आहे
वर्षभरात २५ टक्क्यांनी वाढले भाव
बाजारभावाच्या मूल्यानुसार जमिनीचे दर हे वर्षाला वाढत असले तरी जमिनींना मात्र मागणी कमी आहे अनेक वेळा मागणी कमी असल्याने बाजार मूल्य वाढूनही त्याचा कोणताही फायदा जमीन मालकांना होत नाही
रस्त्याशेजारी, समुद्रकिनाऱ्यावर दुप्पट भाव
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिनीचे दर हे नव्या मुंबई गोवा महामार्गालगत तसेच वेंगुर्ले मालवण तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या जमिनींना दुप्पट ते तिप्पट भाव देऊन ती जमीन विकत घेतली जात आहे
सावंतवाडी तालुक्यात काही गावांमध्ये जमिनीचे दर हे उच्चांक आहेत मात्र काही गावात जमली ना त्या प्रमाणात भाव नाही पण थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीला जमिनीचा दर हा उच्चांकी आहे. - रणजित गावडे, सावंतवाडी
दोडका मूर्ख तालुक्यात काही गावांमध्ये जमिनीचे दर हे मोठ्या प्रमाणात आहेत पण काही गावात जमिनीला कवडी मोलाची किंमत असून काही एजंट तसेच मालक या जमिनी कमी किमतीत खरेदी करतात - रामकृष्ण परब, दोडामार्ग