महिलांच्या नेतृत्वाने देश आर्थिक महासत्ता होईल : गावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 06:06 PM2021-03-10T18:06:52+5:302021-03-10T18:08:25+5:30
Women's Day Special sindhudurg- देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे काम महिलाच करू शकतील. महिलांनी पुढे येऊन नेतृत्व केल्यास आपला देश सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार कृषिभूषण एम. के. गावडे यांनी वेंगुर्ला येथे काढले.
वेंगुर्ला : देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे काम महिलाच करू शकतील. महिलांनी पुढे येऊन नेतृत्व केल्यास आपला देश सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार कृषिभूषण एम. के. गावडे यांनी वेंगुर्ला येथे काढले.
महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था तसेच कॉयर बोर्ड भारत सरकार यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित काथ्या उद्योगावर आधारित कार्यशाळा कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोकम, आंबा, काजू, नारळ, जांभूळ, करवंद, अननस, फणस या फळांवर प्रक्रिया केल्यास खूप मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकेल. काथ्या उद्योगात महिलांना मोठी संधी आहे. हा माल नाशिवंत नसल्याने घर कुटुंब चालवूनही महिला स्वयंरोजगार निर्माण करू शकतात.
यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, नगरपंचायत उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल, सावंतवाडी माजी पंचायत समिती सभापती प्रियांका गावडे, निरवडे सरपंच प्रमोद गावडे, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, उद्योजिका सुजाता देसाई, रेडी ग्रामपंचायत सदस्या सायली पोखरणकर, कॉयर बोर्डचे अधिकारी विष्णू देवीदास, प्रविणा खानोलकर, कविता गोळम, प्रतिभा परब, राखी कळंगुटकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, युवक तालुकाध्यक्ष रोहन वराडकर यांसह विविध संस्थांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात देवगड येथील महिला उद्योजिका रंजना कदम, सभापती अनुश्री कांबळी, प्रियांका गावडे, वामन कांबळे, दिपलक्ष्मी पडते, अस्मिता राऊळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रुती रेडकर यांनी केले.
महिला काथ्या संस्थेची यशस्वी घोडदौड
काथ्या उद्योगाच्या माध्यमातून सर्व महिलांच्या सहकार्याने महिला काथ्या संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. यामुळे या माध्यमातून पुढे जाऊन सर्व महिलांना सक्षम करूया. महिला सबलीकरणासाठी कॉयर बोर्ड, कोकोनट बोर्ड व आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे प्रतिपादन यावेळी प्रज्ञा परब यांनी केले.