अवैध दारू वाहतुकीसह अमली पदार्थावर कडक कारवाई करा; गृहमंत्र्यांची सक्त ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 09:13 PM2021-12-14T21:13:53+5:302021-12-14T21:14:25+5:30

मुंबईत दिपक केसरकराच्या उपस्थितीत बैठक

Crack down on narcotics, including illegal alcohol trafficking; Home Minister's stern warning | अवैध दारू वाहतुकीसह अमली पदार्थावर कडक कारवाई करा; गृहमंत्र्यांची सक्त ताकीद

अवैध दारू वाहतुकीसह अमली पदार्थावर कडक कारवाई करा; गृहमंत्र्यांची सक्त ताकीद

Next

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात गोवा बनावटीच्या दारू सह अमली पदार्थ ची वाहतूक होत असेल तर पोलीसांकडून कडक अशी कारवाई व्हावी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिमेवर गस्त वाढवा नाकाबंदी करा अशी सक्त सूचना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हा पोलीसांना दिली आहे,अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत ची बैठक  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीला सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर,अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव आनंद लिमये, प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय वर्मा,  राज्य गुप्त वार्ता विभाग आशुतोष डुंबरे,पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते,सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदि उपस्थीत होते.

या बैठक बाबत आमदार केसरकर यांनी माहिती दिली या बैठकीत प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारी अवैध दारू वाहतूक रोखण्या बाबत सक्त सुचना देण्यात आल्या असून अमली पदार्थ रोखण्यासाठी पोलीस पथक तयार करून कारवाई करण्याच्या सुचना ही देण्यात आल्या आहेत.यावेळी केसरकर यानी बांदा व आंबोली येथे नव्याने पोलीस ठाणी निर्माण करण्या बाबत या बैठकीत लक्ष वेधले त्याला प्राधान्य क्रम दिला जाईल असे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.

जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने तसेच जिह्यालगत गोवा राज्य असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात.  जिल्ह्यातील वाढत्या अमली पदार्थ वाहतूक, विक्रीला आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी प्रभावी उपाययोजना करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पर्यटकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन सिंधुदुर्ग, औरंगाबाद व नागपूर जिल्ह्यामध्ये टुरिझम पोलीस संकल्पना राबविण्यासाठी  तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वळसे पाटील यांनी दिले. कुडाळ आणि बांदा येथे नवीन पोलिस स्टेशन इमारती, आंबोली व शिरोडामध्ये सब पोलिस स्टेशनची निर्मिती याबाबत सविस्तर चर्चा झाली. 

सावंतवाडी संस्थान काळापासून असलेल्या जिल्हा कारागृह येथे येरवडा जेल टुरिझम प्रमाणे जेल टुरिझम सुरु करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना गृहमंत्र्यांनी यावेळी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग दऱ्याखोऱ्याचा असल्याने त्या सर्वांवार नियंत्रण करण्याच्या दृष्टीने आंबोली पोलीस स्टेशन दर्जावाढ तसेच शिरोडा पोलीस स्टेशनयेथील दुरक्षेत्र दर्जावाढ करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.  सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी जिह्वा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

Web Title: Crack down on narcotics, including illegal alcohol trafficking; Home Minister's stern warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.