दहा अपंगांनी एकत्र येत गट तयार करा
By admin | Published: March 30, 2016 10:43 PM2016-03-30T22:43:48+5:302016-03-30T23:45:23+5:30
काळसे येथे मेळावा : ग्रामपंचायतीच्यावतीने अपंगांना टेबल फॅनचे वाटप
चौके : अपंग मुलांच्या पाठिशी त्यांच्या पालकांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. अपंगाने स्वत: पुढे आल्याशिवाय त्याचा उद्धार होणार नाही. अपंग सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे. कमीत कमी १०
अपंगांनी एकत्र येऊन गट तयार करा. शासन तुमच्याकडे येणार नाही तर तुम्ही तिथपर्यंत जाऊन शासनाच्या
विविध योजना समजावून घेऊन त्यांचा लाभ घेतला पाहिजे आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता
स्वत: निर्माण करायची आहे, असे
आवाहन अपंग बांधवांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब पाटील यांनी
केले.
ग्रामपंचायत काळसे, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आणि काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्था यांच्यावतीने रविवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परबवाडा काळसे नं. १ येथे अपंग बांधवांचा मेळावा घेण्यात आला. हा अपंग मेळावा राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मालवण पंचायत समितीचे माजी सभापती उदय परब, राजेंद्र परब, काळसे सरपंच भावना मेस्त्री, युनियन बँक कुडाळचे शाखा प्रबंधक संदीप घुले, उपशाखा प्रबंधक विजय तुळसकर, पन्हाळा तालुका अपंग सेलचे अध्यक्ष अरुण पाटील, काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष विनोद धुरी, पॅराडाईज फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष विनय सावंत, उपसरपंच चंद्रकांत दळवी, व्ही. डी. प्रभू, एम. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यास पंचक्रोशीतील अपंग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (वार्ताहर)