कर्नाटकातील ट्रॉलर्स पकडला
By admin | Published: October 16, 2015 11:15 PM2015-10-16T23:15:53+5:302015-10-16T23:25:31+5:30
स्थानिक मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान
देवगड : देवगड समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या व स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील न्यू अरेबियन या पर्ससिन ट्रॉलर्सला शुक्रवारी पकडण्यात यश आले. या ट्रॉलर्ससह सात खलाशांना बंदर व मत्स्य विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून, सायंकाळी त्या ट्रॉलर्सवरील मासळीचा लिलाव करून त्याच्या पाचपट रकमेचा दंड त्यांना ठोठावण्यात येणार आहे. दंड भरल्यानंतरच या ट्रॉलर्सची मुक्तता करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
देवगड समुद्रामध्ये आठ वावाच्या आत मलपी कर्नाटक येथील पर्सनेट मच्छिमार नौकांनी घुसखोरी करून मच्छिमारी करीत असल्याचे स्थानिक मच्छिमारांना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास आढळून आले. स्थानिक मच्छिमारांनी संबंधित खात्याकडे संपर्क साधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच या पर्सनेट नौकांनी स्थानिक मच्छिमार नौकांच्या जाळ्याचे नुकसान केले होते. या घटनेनंतर तत्काळ मच्छिमार व्यावसायिक एकवटले व त्यांनी या घटनेसंदर्भात रितसर पंचनामे करण्यात यावे, सात खलाशी ताब्यात
स्थानिक मच्छिमारांनी आपली नुकसान झालेली जाळी देवगड बंदर जेटीमध्ये ठेवून पोलिसांना पंचनामे करण्यास सांगितले व मलपी येथील घुसखोर बोटींचा पाठलाग करून त्यांना पकडण्याची मच्छिमारांनी मागणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देवगड पोलिसांनी स्थानिक मच्छिमारी नौकांच्या फाटलेल्या जाळ्यांचे पंचनामे केले. स्पीड बोटीच्या सहाय्याने पाठलाग करून न्यू अरेबियन या बोटीवर ताबा मिळवून सात खलाशांना ताब्यात घेतले. अशी मागणी मत्स्यव्यवसाय खात्याकडे केली.
२0 लाखांचे नुकसान
त्यांच्याकडील मच्छीचा लिलाव करून लिलावाच्या पाच पट दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई देवगड पोलीस, देवगड फिशरमेन विभाग, कस्टम विभाग यांनी स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने केली आहे. सुमारे ३५ हून अधिक मच्छिमारी व्यावसायिकांचे १५० जाळ्यांचे एकूण २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत.
दिक्षिता दिलीप धुरी यांच्या नौकेवरील १० जाळ््यांचे नुकसान, योगेश धुरी यांच्या देवयानी नौकेवरील २ जाळ््यांचे नुकसान, अश्विनी धुरी यांच्या राजलक्ष्मी नौकेवरील ४ जाळ््यांचे नुकसान, अनुष्का धुरी यांच्या लक्ष्मा नौकेवरील दोन जाळ्यांचे नुकसान, सुशांत प्रभू यांच्या आई भवानी नौकेवरील २६ जाळ््यांचे नुकसान, भाग्यश्री बापर्डेकर यांच्या भद्रकाली नौकेवरील ३ जाळ््यांचे नुकसान, मिलींद बोरकरांच्या लतिका नौकेवरील ६ जाळ््यांचे नुकसान, धनश्री बोरकरांच्या मधुगिरी नौकेवरील ४ जाळ्यांचे नुकसान, पल्लवी कांदळगावकर यांच्या पांडुरंग कृपा नौकेवरील ५ जाळ््यांचे नुकसान, अरुण फणसेकरांच्या स्वामीराया नौकेवरील ४ जाळ््यांचे नुकसान, धनंजय कोयंडे यांच्या ओम गणेश नौकेवरील ५ जाळ््यांचे नुकसान, संजय रूमडे यांच्या श्रीराम नौकेवरील २ जाळ््यांचे नुकसान तसेच अविनाश चोपडेकर, महेंद्र चौगुले, प्रशांत कोयंडे, प्रफुल्ल गोळवणकर, माया गोलतकर, लक्ष्मण गोलतकर, प्रतिभा गोलतकर, पांडुरंग हिरनाईक, शितल बापर्डेकर, अभय पवार, तेजल चोपडकर, उमेश राणे, आंबेरकर, उत्कर्षा लोणे, उमेश लोणे, प्रभाकर पेडणेकर, प्रमोद पेडणे अशा मच्छिमारांच्या नौकेवरील जाळ््यांचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)