हिंदळे येथील गंभीर जखमी प्रौढाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:52 AM2019-11-04T11:52:08+5:302019-11-04T11:54:10+5:30

दुचाकीने जात असताना चक्कर आल्याने पडून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या हिंंदळे येथील देवानंद रामचंद्र पारकर (४०) यांचा कणकवली येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा अपघात मिठबांव-कातवण मार्गावर गोरक्ष गणपती मंदिरानजीक शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास झाला.

Critically injured adult dies in Hindale | हिंदळे येथील गंभीर जखमी प्रौढाचा मृत्यू

हिंदळे येथील गंभीर जखमी प्रौढाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देहिंदळे येथील गंभीर जखमी प्रौढाचा मृत्यूचक्कर आल्याने दुचाकीसहीत गटारात

मिठबांव : दुचाकीने जात असताना चक्कर आल्याने पडून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या हिंंदळे येथील देवानंद रामचंद्र पारकर (४०) यांचा कणकवली येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा अपघात मिठबांव-कातवण मार्गावर गोरक्ष गणपती मंदिरानजीक शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास झाला.

याबाबत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, देवानंद हा शनिवारी सकाळी कातवण येथून मिठबांवकडे दुचाकीने जात असताना मिठबांव गोरक्ष मंदिरानजीक त्याला दुचाकी चालवित असताना चक्कर आली. तो दुचाकीसहीत रस्त्याचा बाजूला असलेल्या गटारात पडला.
जखमी अवस्थेत तो गटारात पडलेल्या स्थितीत होता.

याबाबत माहिती समजताच मिठबांव येथील भाई नरे, शैलेश लोके व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मिठबांव येथील रामेश्वर प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने त्याला प्रथम मिठबांव आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत व अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याला कणकणवली येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Critically injured adult dies in Hindale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.