फक्त टीका करून विकास होणार नाही :विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 06:35 PM2021-01-11T18:35:46+5:302021-01-11T18:38:01+5:30

Vinayak Raut shivsena Kankavli Sindhudurg-शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे व त्यांचे पुत्र टीका करीत आहेत. मात्र, कोणावर तरी फक्त टीका करून येथील विकास होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल.त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

Criticism alone will not lead to development: Vinayak Raut | फक्त टीका करून विकास होणार नाही :विनायक राऊत

कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी खासदार विनायक राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, वैभव नाईक, अरूण दुधवडकर, सतीश सावंत, संदेश पारकर, निलम सावंत, आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देफक्त टीका करून विकास होणार नाही :विनायक राऊत

कणकवली : शिवसेना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे व त्यांचे पुत्र टीका करीत आहेत. मात्र, कोणावर तरी फक्त टीका करून येथील विकास होणार नाही. त्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल.त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यांचे विविध घोटाळे आम्हाला माहीत असून विनाकारण आमच्या कोणी वाकड्यात शिरले तर त्याला सरळ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले. कणकवली येथील महाडिक कंपाऊंड परिसरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, कामगार नेते निलेश पराडकर, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते, युवानेते संदेश पारकर, अतुल रावराणे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, बाळा भिसे, महिला जिल्हा संघटक निलम सावंत-पालव, शैलेश भोगले, मिलिंद साटम, रवींद्र जोगल, विलास साळसकर, सुशांत नाईक, गितेश कडू, दिगंबर पाटील, राजू राठोड, प्रथमेश सावंत, हर्षद गावडे आदी उपस्थित होते.

विनायक राऊत म्हणाले, उद्याच्या महा विकास आघाडीच्या आमदाराचे हे कार्यालय आहे. विकासाचे शिवधनुष्य उदय सामंत आणि माझ्याकडे आहे. मतदारसंघाशी आमचे घट्ट नाते असून राणेंनी त्यांच्या पदाला शोभेल अशी टीका करावी. तुम्हाला शिवसेनेने मुख्यमंत्री केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली. उद्धव ठाकरे दुष्मनावर सुद्धा प्रेम करतात. असेही ते म्हणाले.

खासदार राऊत म्हणाले, पोपट पंची करणारा माजी आमदार मला शिव्या घालणार असेल तर घालू दे. मात्र , मी रिफायनरीचे समर्थन करणार नाही. आम्ही इनोव्हेशन कोकण योजना आणणार आहोत. मी खासदार झालो तेव्हा चिपी विमानतळाचे १४ टक्के फक्त काम झाले होते. आता काम पूर्णत्वास जात आहे. २५०० रुपयात मुंबईला जाता येणार आहे. तेथून दररोज विमाने विविध ठिकाणी जाणार आहेत.

जिल्ह्यातील पाणी पुरवठा प्रकल्प आहेत त्यांची पाहणी आम्ही करणार असून येत्या तीन वर्षात ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी अरूण दुधवडकर, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, निलम सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी केले.

आता पेटून उठले पाहिजे

ज्यांच्याजवळ विकासाचे काहीच मुद्दे नाहीत ते नुसती टीका करीत आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायतीबरोबरच आगामी सर्व निवडणुकांमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळविले पाहिजे. त्यासाठी शिवसैनिकांनी आता पेटून उठले पाहिजे. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यांना सरंक्षण तर मिळेलच. पण , त्यांच्या पाठीमागे सरकार म्हणून आम्ही सर्वजण असू ,असे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.
 

Web Title: Criticism alone will not lead to development: Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.