करुळ घाटात साईडपट्टीला भगदाड

By Admin | Published: July 14, 2016 12:24 AM2016-07-14T00:24:52+5:302016-07-14T00:30:32+5:30

दरड कोसळलेल्याचा परिणाम : बॅरल ठेवून धोकादायक भाग बंदिस्त

Crossing the sidebar in Karal Ghat | करुळ घाटात साईडपट्टीला भगदाड

करुळ घाटात साईडपट्टीला भगदाड

googlenewsNext

वैभववाडी : करुळ घाटात कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याची साईडपट्टी खचून भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्याठिकाणी बॅरल लावून सार्वजनिक बांधकामने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. सलग चार दिवस धो-धो कोसळलेल्या पावसाचा जोर बुधवारी काहीसा ओसरला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे तिथवलीत गोठा जमीनदोस्त झाला असून मंगळवारी तालुक्यात सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.
सोमवारी वैभववाडी तालुक्यात पावसाने रौद्ररुप धारण केल्याने करुळ घाटात दरड कोसळली होती. ती दरड तब्बल चौदा तासांनी हटविली. मात्र, कोसळेल्या दरडीमुळे रस्त्याची साईडपट्टी खचून भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. पावसामुळे हे भगदाड वाढून रस्त्याचा पृष्ठभाग खचण्याची शक्यता आहे. खचलेल्या साईडपट्टीमुळे वाहतूकीला बाधा होऊ नये, यासाठी खचलेल्या साईडपट्टीभोवती बॅरल लावून तो भाग बंदीस्त केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीस तेथे वाहतुकीला धोका कमी असला तरी भगदाड भरुन न घेतल्यास पावसामुळे येथील भाग आणखी खचून भगदाड वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारच्या पावसाची १५५ मिलीमीटर एवढी नोंद झाली असून या पावसामुळे तालुक्याच्या विविध भागात घरे व गोठ्यांची पडझड झाली आहे. तिथवली येथील अनंत रोगये याचा गोठा जमीनदोस्त झाला असून त्यांचे सुमारे तीस हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच अशोक तांबे यांच्या घराच्या छप्पराचे पत्रे फुटले. त्याचप्रमाणे सुनील हरयाण यांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. नाधवडेतील यांच्या घराच्या पडवीवर झाड पडल्यामुळे दोन हजारांचे नुकसान झाले आहे. बुधवारी पावसाचा जोर ओसरल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला. मात्र, पाण्यामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग सोमवारपासून बंद असल्याने आठवडा बाजारात भाजी विक्रेत्यांची संख्या कमी होती. त्यामुळे आठवडा बाजारातील भाजीचे दर वाढले होते. या दरवाढीचा फटका बाजाराला आलेल्या ग्राहकांना बसला.(प्रतिनिधी)

Web Title: Crossing the sidebar in Karal Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.