मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची कणकवली रेल्वेस्थानकात गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:37 PM2021-04-21T16:37:09+5:302021-04-21T16:40:12+5:30
Kankavli CoronaVirus RailwayStation Sindhdurg : रेल्वे स्थानकावर मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची मोठी गर्दी होती. यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीकरिता येणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे स्थानकातच आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये १५० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कणकवली : रेल्वे स्थानकावर मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची मोठी गर्दी होती. यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीकरिता येणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे स्थानकातच आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये १५० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कणकवली रेल्वे स्थानकात मुंबईहून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची रॅपिड टेस्ट केली जात होती. मात्र, मंगळवारी रॅपिड टेस्टच्या किटचा तुटवडा निर्माण झाल्याने या प्रवाशांपैकी कोणी संशयित आढळल्यास त्याची आरोग्य विभागाच्या पथकाकडून रॅपिड टेस्ट करण्यात येत होती. तसेच इतर प्रवाशांची फक्त थर्मल गनने टेंपरेचर व ऑक्सिमीटरने ऑक्सिजन तपासणी करून रजिस्टरला नोंदी करण्यात आल्या आहेत.
पटवर्धन चौकातही टेस्ट किटचा तुटवडा
कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात थर्मल स्क्रिनिंगमध्ये सातत्य ठेवण्यात आले असून, कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ त्या व्यक्तीची रॅपिड टेस्टही केली जात आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या वतीने पुरविण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट किटपैकी काही किट शिल्लक असून, बुधवारपर्यंत या टेस्ट किटचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे रॅपिड टेस्ट करण्यासाठी आणखी किट तत्काळ उपलब्ध करणे आवश्यक आहे.