खराब फर्निचर पुरविल्याबाबत तीस हजार रुपये देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:57 PM2017-08-24T15:57:00+5:302017-08-24T15:57:00+5:30
सिंधुदुर्गनगरी दि. २४ : कुडाळ येथील रविकमल फर्निचरकडून अविनाश पाटील यांनी घेतलेल्या फर्निचर वारंटीपूर्वीच खराब झाल्याबदल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामार्फत कुडाळच्या रविकमल फर्निचर यांना ३0 हजार रुपये पाटील यांना द्यावेत असा आदेश सुनावला आहे.
सिंधुदुर्गनगरी दि. २४ : कुडाळ येथील रविकमल फर्निचरकडून अविनाश पाटील यांनी घेतलेल्या फर्निचर वारंटीपूर्वीच खराब झाल्याबदल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामार्फत कुडाळच्या रविकमल फर्निचर यांना ३0 हजार रुपये पाटील यांना द्यावेत असा आदेश सुनावला आहे.
कुडाळच्या शिवाजीनगर येथील रहिवाशी अनिवाश विनायक पाटील यांनी घरगुती वापरासाठी दिनांक 0१ एप्रिल २0१६ रोजी मेटल बॉक्स बेड एकूण तीन व एक आराम खुर्ची असे साहित्य रविकमल फर्निचर वर्क्सचे प्रोपा. रविंद्र राऊळ यांच्याकडून रु. २८.५00 (अक्षरी रुपये आठ्ठावीस हजार पाचशे मात्र) इतकी रक्कम देवून खरेदी केले होते.
विकत घेतलेल्या फर्निचरमध्ये बसविण्यात आलेल्या फ्लायवूडला १५ वर्षाची गॅरंटी तसेच वाळवी प्रूफ असल्याची हमी रविंद्र राऊळ यांनी अविनाश पाटील यांना दिली होती. परंतु दि. ३0 जुलै २0१६ रोजी म्हणजे फर्निचर खरेदी केल्यानंतर तीनच महिन्याने प्लायवूड मधून पांढरा भुगा व बारीक कीड बाहेर पडत असल्याचे पाटील यांचे लक्षात आल्याने त्यांनी रविकमल फर्निचर वर्क्सचे प्रोपा रविंद्र राऊळ यांच्याकडे स्वत: जावून तक्रार केली. परंतु राऊळ यांनी पाटील यांचे म्हणणे एकूण घेतले नाही व उडवाउडवीची उत्तरे दिली.
ग्राहक म्हणून पाटील यांना द्यावयाच्या सेवेत रविकमल फर्निचर चे प्रोपा. यांनी त्रुटीपुर्ण व्यवहार केला म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग येथे तक्रार दाखल करुन फर्निचरच्या खरेदी पोटी दिलेली रक्कम रु. २८५00 (अक्षरी रुपये आठ्ठावीस हजार पाचशे मात्र) शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.२५,000 व तक्रारीचा खर्च रु८000 /- (अक्षरी रुपये आठ हजार मात्र) इतक्या रक्कमेची मागणी रविकमल फर्निचरचे प्रोपा. यांच्याकडून प्राप्त व्हावी म्हणून दाखल केली.
ग्राहक मंचाला चौकशीअंती तक्रारदार पाटील यांना विरुध्द पक्षकार रविंद्र राऊळ यांनी सदोष सेवा दिल्याचे आढळून आल्याने त्यांनी अनिवाश पाटील यांना ३0 दिवसांचे आत नविन चांगल्या प्रतीचे फ्लायवूड मेटल बॉक्स बेडला लावून द्यावे. न दिल्यास मेटल बॉक्सची किंमत रु. २६000/- ( अक्षरी रुपये सव्वीस हजार मात्र) तक्रारदारास द्यावी. तसेच शारिरिक मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खचार्पोटी रु. ४000/- (अक्षरी रुपये चार हजार मात्र) अशी एकूण रु.३0,000/- (अक्षरी रुपये तीस हजार मात्र) इतकी रक्कम अविनाश पाटील यांना विरुध्दपक्ष रविंद्र राऊळ यांनी द्यावी असा निर्णय दिला.