महिलेस छेडणाऱ्या मद्यधुंद परप्रांतीयास चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:16 AM2019-04-01T11:16:25+5:302019-04-01T11:18:23+5:30

मद्यधुंद अवस्थेत महिलेची छेड काढून महाराष्ट्रीयन लोकांना शिवीगाळ करणाऱ्या एका परप्रांतीयास स्थानिकांनी पकडून बेदम मारहाण केली. यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशीही त्याने हुज्जत घातली. बंडो चरण महतो असे त्याचे नाव असून तो अरुणा प्रकल्पावर कामाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. 

Cut the dragon | महिलेस छेडणाऱ्या मद्यधुंद परप्रांतीयास चोप

महिलेस छेडणाऱ्या मद्यधुंद परप्रांतीयास चोप

Next
ठळक मुद्देमहिलेस छेडणाऱ्या मद्यधुंद परप्रांतीयास चोपपोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

वैभववाडी : मद्यधुंद अवस्थेत महिलेची छेड काढून महाराष्ट्रीयन लोकांना शिवीगाळ करणाऱ्या एका परप्रांतीयास स्थानिकांनी पकडून बेदम मारहाण केली. यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशीही त्याने हुज्जत घातली. बंडो चरण महतो असे त्याचे नाव असून तो अरुणा प्रकल्पावर कामाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. 

एका बँकेत कामानिमित्त आलेला महतो दुपारी तर्रर्र होऊन बाजारपेठेत फिरत होता. बाजारपेठेतील एक महिला आणि तरुणी संभाजी चौकातून जात असताना महतो याने त्यांना रस्त्यात अडवून महिलेच्या हातातील डबा हिसकावून
घेतला.

यावेळी त्याच्या हातातून महिलेने डबा काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने तिला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यामुळे महिलेने पतीला बोलावून घेतले. तिच्या पतीने त्या परप्रांतीयाच्या हातातील डबा काढून घेताच त्याने महाराष्ट्रीयन लोकांचा उल्लेख करीत शिव्या देण्यास सुरुवात केली.

त्यामुळे तेथे जमलेल्या स्थानिकांनी परप्रांतीयास मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतरही तो जोरजोरात शिवीगाळ करीत होता. त्यामुळे संतप्त जमावाने त्याला लाथाबुक्यानी मारले.

या घटनेचे दृश्य सीसीटीव्हीद्वारे दिसताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या परप्रांतीयाला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पोलिसांशीही हुज्जत घातली. तरीही पोलिसांनी गाडीत कोंबून त्याला पोलीस ठाण्यात नेले.

महतो विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करुन पोलिसांनी त्याला धरणावरुन आलेल्या सहकाऱ्यांच्या ताब्यात दिले. दरम्यान या प्रकारामुळे बंडो चरण महतो यास कामावरुन काढून टाकण्याबाबत व्यवस्थापनाने पाऊल उचलले असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

Web Title: Cut the dragon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.